नाणीजमध्ये गुरुवारी श्रीरामनवमी उत्सव

नाणीजमध्ये गुरुवारी श्रीरामनवमी उत्सव

नाणीजमध्ये गुरुवारी श्रीरामनवमी उत्सव

रत्नागिरी, ता. २७ ः नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानमध्ये ’श्रीराम नवमी’ वारी उत्सव गुरुवारी (ता. ३०) उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सावाची सुरवात उद्या (ता.२९) विविध धार्मिक कार्यक्रमाने व यागाने होईल. त्यानंतर सुंदरगड व नाथांचे माहेर येथील देवदेवतांना श्रीराम नवमी सोहळ्याची निमंत्रणे देण्यात येणार आहे. वाद्यांच्या गजरात, मिरवणुकांनी हा कार्यक्रम होईल. सुंदरगडावर श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या सुंदर मूर्ती असलेले श्रीराम मंदिर आहे. या सोहळ्यानिमित्त श्रीराम मंदिरासह सुंदर गडावरील सर्वच मंदिरे सुशोभित करण्यात आली आहेत. ३० मार्च रोजी मुख्य सोहळा आहे. सकाळी ११.३० ते १ या काळात जन्मोत्सव होईल. यात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी होणार आहेत. यावेळी श्रीरामाची गाणी, पाळणा म्हटला जाईल. पुष्पवृष्टी केली जाईल. प्रसाद, महाप्रसाद असेल. श्रीरामाचा जयजयकार करीत सारे आनंदोत्सव साजरा करतील. त्यापूर्वी चरण दर्शन, धर्मक्षेत्र मासिकाची उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्‍या जिल्ह्यांचा सत्कार होईल. रात्री ७.३० ते ८.३० या कालावधीत कानिफनाथ महाराजांचे अमृतमय प्रवचन होईल. त्यानंतर सर्वांचे आकर्षण असलेले जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचे अमृतमय प्रवचन होईल. त्यानंतर देवाला साकडे घालून वारी उत्सवाची सांगता होईल. दरम्यान या सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. २९, ३० मार्च असे दोन दिवस आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज हॉस्पिटलमध्ये नामवंत डॉक्टर तपासणी व उपचार करणार आहेत. दोन दिवस २४ तास महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com