कुडाळमध्ये क्षय रोगाबाबत पथनाट्य, फेरीतून जनजागृती

कुडाळमध्ये क्षय रोगाबाबत पथनाट्य, फेरीतून जनजागृती

swt2717.jpg
L91755
कुडाळः येथील बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयातर्फे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जागृती फेरी काढण्यात आली.


कुडाळमध्ये क्षय रोगाबाबत
पथनाट्य, फेरीतून जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २७ः क्षयरोग हा जगातील गंभीर आजारांपैकी एक आहे. या आजारामुळे दरवर्षी भारतासह जगभरामध्ये लाखो लोकांचा मृत्यू होत असतो. लोकांमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती व्हावी, यासाठी दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग संचलित बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालय, कुडाळ व जिल्हा क्षयरोग कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने जनजागृतीपर फेरी व पथनाट्य सादर करण्यात आले.
जनजागृती फेरीची सुरुवात येथील ग्रामीण रुग्णालयाकडून करून पंचायत समितीकडे सांगता करण्यात आली. जनजागृती फेरीचा प्रारंभ डॉ. सई धुरी यांच्या हस्ते करण्यात आला. या फेरीमध्ये ‘क्षयरोग होऊ शकतो बरा, त्यावर त्वरित उपचार करा.,’ ‘जन जन को जगाना है, टी.बी. को हराना है’ आदी विविध घोषवाक्ये देऊन जागृती करण्यात आली. नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेरुर-देऊळवाडा व पिंगुळी-म्हापसेकर तिठा या ठिकाणी क्षयरोग जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. या क्षयरोग जनजागृती मोहिमेसाठी बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्य मीना जोशी, उपप्राचार्य कल्पना भंडारी, प्रा. प्रथमेश हरमलकर, प्रा. वैजयंती नर, प्रा. नेहा महाले, डॉ. हर्षल जाधव, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश करतसकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी लक्ष्मण कदम, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक सुरेश मोरजकर, क्षयरोग पर्यवेक्षक सिद्धेश राणे, रोग पर्यवेक्षक शीला आंब्रे, क्षयरोग पर्यवेक्षक प्राथमिक आरोग्य केंद्र पणदूरचे आरोग्य कर्मचारी, सीएचओ, आशा स्वयंसेविका इत्यादी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com