यंदा आमदार निधी 5 कोटीचा

यंदा आमदार निधी 5 कोटीचा

आमदारांना ५ कोटींचा स्थानिक विकास निधी

राज्य शासनाचा निर्णय ; जिल्ह्याला मिळाले २५ कोटी, बहुतेकांकडून १०० टक्के खर्च
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ ः आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आमदाराच्या निधीमध्ये राज्याने ३ कोटीची घसघशीत वाढ केली आहे. त्यामुळे यंदापासून २ कोटीऐवजी आमदारांना प्रथमच ५ कोटीचा स्थानिक विकासनिधी मिळाला आहे. खासदार विकास निधीएवढा हा निधी आहे. जिल्ह्यातील पाच आमदारांचा २५ कोटीचा निधी नियोजन विभागाला मिळाला आहे. बहुतांशी हा आमदार विकासनिधी खर्च झाल्याची माहिती नियोजन विभागाकडून मिळाली आहे.
आमदार स्थानिक विकास निधी कार्यक्रमांतर्गत मतदार संघातील विविध विकासकामे करण्यासाठी विधानसभा सदस्य असलेल्या आमदारांना शासनाकडून दरवर्षी निधी दिला जातो. गतवर्षापर्यंत आमदारांना प्रत्येकी २ कोटी निधी मिळत होता; परंतु गेल्या वर्षीपासून ४ कोटी रुपयांचा विकासनिधी दिला जात होता. २८ जून २०२२ च्या शासननिर्णयानुसार २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून या विकासनिधीत आणखी १ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे आमदारांचा विकासनिधी ५ कोटी रुपयांचा करण्यात आला आहे. ३१ मार्चपूर्वी १०० टक्के स्थानिक निधी विकासकामांवर खर्च असल्याचा विश्वास जिल्ह्यातील या पाचही विद्यमान आमदारांकडून व्यक्त केला जात आहे. या पाच आमदारांचा २५ कोटी विकासनिधी जवळजवळ खर्च होत आला आहे.
-
आमदाराचा खर्च झालेला निधी
KOP19I94985
*आमदार उदय सामंत ः रत्नागिरीचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांचे पूर्वीपासूनच लक्ष मतदारसंघातील विकासकामांवर आहे. मतदारसंघातील लोकांच्या मागणीनुसार कामांना अधिक प्राधान्य देऊन ती विकासकामे करून घेण्यात ते अग्रेसर आहेत. आतापर्यंत ९५ टक्के निधी खर्च झाला असून, यात नळपाणी योजना, रस्ते, पाखाडी, ग्रामपंचायत सभागृहांचा समावेश आहे. अखर्चित राहिलेला निधी काही दिवसातच खर्च होणार
-KOP19I94985
*आमदार भास्कर जाधव ः गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्याही मतदार संघातील जवळपास कामे पूर्ण होत आली आहेत. रस्ते हे विकासाचे मुख्य द्योतक असल्याने रस्त्यांची कामे अधिक प्रमाणावर करण्याकडे त्यांचा कल आहे. त्याचबरोबर मतदार संघातील जनतेच्या कामांच्या मागणीला प्राधान्य देऊन ती कामे करण्याकडे त्यांचा अधिक कल आहे. उर्वरित १० टक्के कामेही ३१ मार्चपूर्वी पूर्ण होऊन १०० टक्के निधी खर्च होणार असल्याचा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
--KOP19I59582
*आमदार शेखर निकम ः चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी मतदार संघात नियोजनबद्ध विकासकामे करून बहुतांश कामे पूर्ण केली आहेत. शेवटच्या टप्प्यात जेमतेम कामे ठेवली आहेत. त्यामुळे यासाठीचा केवळ १० टक्केच निधी अखर्चित राहिला आहे. त्यासाठी अजूनही बरेच दिवस हातात आहेत. त्यामुळे उरलेना १० टक्के निधीही या कालावधीत पूर्णपणे खर्च होणार असल्याचा विश्वास आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला आहे.
---
KOP22L66448
*आमदार राजन साळवी ः राजापूरचे आमदार राजन साळवी यांचीही मतदार संघातील कामे पूर्ण करण्याकडे वाटचाल सुरू आहे. त्यांच्या स्थानिक निधीपैकी जवळपास सर्वच निधी खर्च झाला असून, आता ८० टक्के निधी खर्चित असल्याची माहिती त्यांचे स्वीय्य सहाय्यक सुभाष मालप यांनी दिली. यात मतदाराच्या मागणीनुसार रस्त्यांना जास्त प्राधान्य देण्यात आले आहे. विकासकामांवरील उरलेला निधीही आठवडाभरात खर्च होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
-
KOP21K21702
*आमदार योगेश कदम ः दापोलीचे आमदार योगेश कदम यांनीही आमदार निधीतून अनेक कामे केली आहेत. गेल्या वर्षीही त्यांनी १०० टक्के निधी खर्च केला होता. त्यामुळे यावर्षीही त्यांचा निधी ३१ मार्चपूर्वी १०० टक्के खर्च होईल. योगेश कदम अधिवेशनात असल्याने तसेच त्यांचे स्वीय्य सहाय्यक यांच्याशी संपर्क न झाल्याने आत्तापर्यंत त्यांच्या खर्च झालेल्या निधीबाबत कळू शकले नाही.
--
कोट
स्थानिक आमदार विकासनिधीमध्ये राज्य शासनाने भरीव वाढ केली आहे. शासनाने आणखी एक कोटी वाढवून यंदा आमदार निधी ५ कोटीचा मिळाला आहे. जिल्ह्यातील पाचही आमदारांचा बहुतेक निधी खर्च झाला आहे.
------ सत्यवान मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com