संक्षिप्त

संक्षिप्त

फोटो ओळी
-rat२७p३७.jpg ःKOP२३L९१७८६ लांजा ः गवाणे येथील कंस, बलराम कृष्णयुद्ध स्पर्धेत श्री नवलादेवी नमन मंडळ हरमलेवाडी देवधे प्रथम क्रमांक पटकावला.

देवधेतील नवलादेवी नमन मंडळ प्रथम
लांजा ः तालुक्यातील गवाणे येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय भव्यदिव्य कंस, बलराम आणि कृष्णयुद्ध स्पर्धेत देवधे येथील श्री नवलादेवी नमन मंडळ हरमलेवाडी या मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. लोककला बहुरंगी नमन मंडळ लांजा आणि शिवसेना उद्धव ठाकरे शाखा गवाणे यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गवाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत एकूण १२ स्पर्धक संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत श्री नवलादेवी नमन मंडळ हरमलेवाडीने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक बनदेवी नमन मंडळ रामाणेवाडी गवाणे तर तृतीय क्रमांक नवलादेवी नमन वनगुळे व जय भराडी नमन मंडळ खानवली चिंचवाडी या दोन संघांना विभागून देण्यात आला. त्याचप्रमाणे उत्कृष्ट बलराम भूमिकेसाठी नवलादेवी नमन मंडळाच्या विजय हरमले यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेतील प्रथम विजेत्या मंडळाला रोख रुपये ५ हजार ५५५ व चषक, द्वितीय ३ हजार ३३३ व चषक आणि तृतीय विजेत्यांना २ हजार २२२ व चषक असे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग उपस्थित होता.

फोटो ओळी
-rat२७p४०.jpg ः KOP२३L९१७९३ राजापूर ः नाट्यसंयोजक विजय कुबडे यांचा सत्कार करताना अ‍ॅड. दशरथ निकम.
--------------
नाट्यसंयोजक विजय कुबडेंचा जीवनगौरव पुरस्काराने गौरव
राजापूर ः तब्बल ४५ वर्षे तालुक्यासह जिल्ह्यामध्ये हजारो नाट्यप्रयोगांचे आयोजन करणाऱ्‍या व वयाच्या सत्तरीतही हा वसा जपणारे शहरातील नाट्यसंयोजक विजय कुबडे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. राजापूर नगर पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात रविवारी (ता. २६) राजापूरकर नाट्यनिर्माते राजन कोठारकर यांच्या झालेल्या ‘अनंतकोटी’ या नाट्यप्रयोगाच्यावेळी माजी नगरसेवक जितेंद्र मालपेकर व पत्रकार महेश शिवलकर यांच्या पुढाकाराने अनंतकोटी या नाटकात स्वामी समर्थांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अ‍ॅड. दशरथ निकम यांच्या हस्ते कुबडे यांचा सत्कार करण्यात आला.


सैतवडेतील समायरा पारेखच्या
व्हिडिओची अभिनेता चौघुलेकडून दखल
रत्नागिरी ः सैतवडे येथील आठ वर्षाच्या समायरा रूमान पारेख या मुलीने अनेक हास्यविनोदी व्हिडिओवर रील्स बनवून इंस्टाग्रामवर पोस्ट केल्या आहेत. समीर चौघुले यांच्या एका प्रसिद्ध लोचन मजनू उंदीर मांजर पकडिंगो यावर आधारित रील्स समायराने बनवून पोस्ट केली. ती रिल अभिनेता समीर चौघुले यांच्या पाहण्यात आली. चौघुले यांनी त्याची दखल घेत समायराला मेसेज करून समायराला धन्यवाद दिले. त्यांच्या विनोदाची आणि कामाची एवढी लहान मुलगी चाहती असू शकते, यांचा त्यांना विश्वास नव्हता. सेलिब्रिटीचा मेसेज पाहिल्यानंतर समायराचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com