
दापोलीतून विधानसभेसाठी संदीप राजपुरेंची घोषणा
फोटो ओळी
-rat२७p३४.jpg ः
९१७९१
नालासोपारा ः कुणबी समाजाच्या बैठकीला उपस्थित प्रतिनिधी.
-
दापोलीतून संदीप राजपुरेंच्या नावाची घोषणा
नालासोपाऱ्यात कुणबी समाजाचा मेळावा ; उमेदवारी देणाऱ्या पक्षालाच पाठिंब्याचा निर्धार
दाभोळ, ता. २७ ः विविध संघटना आणि कुणबी समाजाच्या राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी संदीप राजपुरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी दापोलीतून राजपुरे यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्याचा निर्धार नालासोपारा येथे झालेल्या कुणबी समाजाच्या राजकीय सभेत करण्यात आला.
मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ व कुणबी समाजोन्नती संघाची मंडणगड शाखेतर्फे रविवारी (ता. २६) नालासोपारा येथे कुणबी समाज राजकीय सभा झाली. त्यामध्ये विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. या निवडणुकीत सर्वांचेच लक्ष कोकणातील खेड-दापोली विधानसभा मतदारसंघाकडे लागले आहे. दापोली विधानसभेत घडत असलेल्या राजकीय घडामोडीनंतर आता कुणबी समाजदेखील राजकीयदृष्ट्या एकवटू लागला आहे. जो पक्ष कुणबी समाजाला उमेदवारी देईल, त्या पक्षाच्यामागे कुणबी समाज खंबीरपणे उभा राहील, असा निर्धार कुणबी समाज बांधवांनी केला आहे.
नालासोपारा येथील सभेत उपस्थित असलेल्या विविध संघटना आणि कुणबी समाजाच्या राजकीय तसेच सामाजिक नेत्यांनी संदीप राजपुरे यांना पाठिंबा जाहीर केला. संपूर्ण कोकणात निर्णायक मत असलेल्या कुणबी समाजाला मागची ३५ वर्षे राजकीय वनवास भोगावा लागला आहे. परंतु आता जो राजकीय पक्ष कुणबी समाजाला नेतृत्वाची संधी देईल, निवडणुकीसाठी उमेदवारी देईल त्या राजकीय पक्षाच्या मागे दापोली विधानसभेतील सर्व कुणबी समाज उभा राहील, असा निर्धार करण्यात आला. आम्हाला आमचे प्रश्न मांडण्यासाठी आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आमचा हक्काचा उमेदवार हवा, असं म्हणत सर्वांनी संदीप राजपुरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
कोट
कुणबी समाजाचा उमेदवार मिळावा यासाठी आमच्या विविध पक्षांच्या नेत्यांसोबत बैठका सुरू आहेत. मी स्वतः राष्ट्रवादीचा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहे. मी स्वतः आमचे नेते शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार यांच्याशी समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी संपर्क करत आहे. आमच्या समाजात इतर पक्षांचेदेखील काही नेते आहेत. ते त्यांच्या पक्षाच्या संबंधित नेत्यांशी चर्चा करत आहेत. त्यामुळे जो पक्ष कुणबी समाजाला येत्या निवडणुकीत विधानसभेत उमेदवारी देईल त्या पक्षाच्यामागे कुणबी समाज ठामपणे उभा राहील.
--संदीप राजपुरे, दापोली
-