दबाव झुगारून पालिकेची धडक कर वसुली

दबाव झुगारून पालिकेची धडक कर वसुली

-rat२७p३३.jpg-
९१७८३
रत्नागिरी - घरपट्टी थककलेली सदनिका सील करताना वसुली पथकाचे अधिकारी व कर्मचारी.

दबाव झुगारून पालिकेची धडक कर वसुली

७१ नळजोडण्या तोडल्या; ११२ मालमत्ता केल्या सील

रत्नागिरी, ता. २७ ः घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीमध्ये पालिका प्रशासाने कठोर पावले उचलली आहेत. घरपट्टी वसुलीसाठी ७ पथके कार्यरत ठेवली आहेत. कोणत्याही राजकीय दबावाला न जुमानता कर वसुली सुरू आहे. त्यामुळे आज दिवसभरात घरपट्टी थकित असलेले एकूण ७१ नळ जोडण्यास तोडल्या असून घरपट्टी थकित असलेल्या ११२ मालमत्ता सील केल्या आहेत. पुढील चार दिवसांमध्ये आणखी कडक कारवाई करून करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याव पथकाचा भर आहे. रत्नागिरी पालिकेने वसुलीचे मोठे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. कोरोना महामारीमुळे रखडलेल्या कराने घरपट्टी वसुलीचा आकडा १० कोटीवर गेला आहे. आतापर्यंत पालिकेच्या पथकांनी कारवाई करून आणि नागरिकांना आवाहन करून ७० टक्के म्हणजे ८ कोटी रुपये वसुली झाली आहे. मार्चअखेरीस आता फक्त चार दिवस उरले आहेत. त्यामुळे पालिकेने वसुली पथकांमध्ये वाढ केली आहे.

बीएसएनएल टॉवर होणार सील
उर्वरित चार दिवसांमध्ये अनेक शासकीय कार्यालयांवर कारवाई केली जाणार आहे. बीएसएनएलच्या काही टॉवरचा कर थकला आहे. त्यामुळे दोन दिवसात हे टॉवर सील करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक बीएसएनएल ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com