सहकारी संघ संचालकपदी एम.डी. देसाई बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहकारी संघ संचालकपदी
एम.डी. देसाई बिनविरोध
सहकारी संघ संचालकपदी एम.डी. देसाई बिनविरोध

सहकारी संघ संचालकपदी एम.डी. देसाई बिनविरोध

sakal_logo
By

91824

सहकारी संघ संचालकपदी
एम.डी. देसाई बिनविरोध
दोडामार्ग, ता. २७ ः सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले प्रा. एम. डी. देसाई यांची सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी संघ संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली. गेली पाच दशके त्यांनी जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
प्रा. देसाई यांनी आपल्या कुशल नियोजनाने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातही महत्त्वाचे योगदान दिले आहे. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर दिला. प्रत्येक उपक्रम हा जनतेसाठी विशेषतः युवा पिढीच्या हितासाठी असावा, असा त्यांचा आग्रह असतो. सहकार क्षेत्र महत्त्वपूर्ण असल्यामुळेच पश्चिम महाराष्ट्र या क्षेत्रात पुढे आहे. अर्थकारणाबरोबरच विकासालाही गती मिळाली आहे. त्याचा आदर्श घेऊन त्यावर अभ्यास करुन काम करण्यावर त्यांनी भर दिला. प्रा. देसाई यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांची सिंधुदुर्ग जिल्हा सहकार संघ मर्यादित ओरोसच्या संचालकपदी २०२३ ते २०२८ पाच वर्षांच्या कालावधीसाठी बिनविरोध निवड करण्यात आली.