Sat, June 3, 2023

जानवलीतील चोरी प्रकरणी गुन्हा
जानवलीतील चोरी प्रकरणी गुन्हा
Published on : 27 March 2023, 3:02 am
जानवलीतील चोरी प्रकरणी गुन्हा
कणकवली ः जानवली आदर्शनगर येथील बंद घरात चोरीचा प्रकार घडला. घरातील १३ हजार ५०० रूपयांचे साहित्य चोरीला गेले आहे. ही चोरी ६ मार्चला रात्री झाली असून याबाबात अविनाश शामराव पाटील (वय ५६, गोरेगाव (पुर्व) मुंबई) यांनी येथील पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ५ हजार ६०० रुपयांचे स्टीलचे नळ, ४ हजाराचे पाण्याचे स्टीलचे मिक्सर, २ हजार ८०० रुपयांचे टॉयलेटचे दोन पाण्याचे स्टीलचे जेंट स्प्रे, ६०० रुपयांचे गॅस शेगडीवरील ३ पितळी बर्नर, ५०० रुपयांचे कपाटामध्ये ठेवलेले १ मोठा स्क्रू ड्रायव्हर, १ कटर, १ टेस्टर, १ पकड व दोन कुलुपे असे साहित्य चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमुद आहे.