जिल्हा पत्रकार परिषदेला आदर्श पत्रकार संघ पुरस्कार

जिल्हा पत्रकार परिषदेला आदर्श पत्रकार संघ पुरस्कार

जिल्हा पत्रकार परिषदेला पुरस्कार

रत्नागिरी, ता. २८ : मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघाच्या पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्हा पत्रकार परिषदेची निवड करण्यात आली आहे. परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी सोमवारी ही घोषणा केली.
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दरवर्षी सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या तालुका आणि जिल्हा संघांना वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आदर्श तालुका पत्रकार संघाची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार रत्नागिरी जिल्हा पत्रकार परिषदेला आज जाहीर करण्यात आला. ७ एप्रिल २०२३ ला अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे होणाऱ्या सोहळ्यात राज्यात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या जिल्हा आणि तालुका संघांना सन्मानित करण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्हा पत्रकार परिषदेने अनेक सामाजिक उपक्रम राबविले. त्याचबरोबर विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन पत्रकारांची प्रतिमा उंचविण्याचा प्रयत्न केला. पत्रकार संघाने संगमेश्वर तालुक्यातील वांद्री हे गाव दत्तक घेऊन तेथील जनतेला सर्व प्रकारची आरोग्य व्यवस्था पुरविली. अतिवृष्टीच्या काळात गरजूंना मोठी मदत केली. तसेच राजकीय दबावाची पर्वा न करता वारिशे हत्त्या प्रकरणानंतर त्यांच्या कुटुंबीयांना मोठी मदत मिळवून दिली. रत्नागिरीची निवड करताना या सर्व बाबींचा विचार केला. एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई, कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी रत्नागिरी जिल्हा पत्रकार परिषदेचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com