पालकांचा कल इंग्रजी माध्यमांकडेच

पालकांचा कल इंग्रजी माध्यमांकडेच

- rat28p11.jpg ः
91879
चिपळूण ः मार्गदर्शन करताना आमदार शेखर निकम. सोबत सचिन पाकळे, कृष्णा हरेकर, गजानन नाचरे आदी.

पालकांचा कल इंग्रजी माध्यमांकडेच

आमदार शेखर निकम ः कोकरे शाळेचा अमृत महोत्सव

सावर्डे, ता. 28 ः मराठी शाळांमधून शिकलेली मुले चांगल्या हुद्द्यावर आहेत. तरीही इंग्रजी माध्यमांकडेच पालकांचा कल आहे. विद्यार्थ्यांना खऱ्या संस्कृतीचे शिक्षण प्राथमिक शाळेतून मिळते, असे प्रतिपादन चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी केले.
चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकरे गोरिवलेवाडी शाळेच्या अमृत महोत्सव कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. आमदार निकम म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाचे दालन सुरू करण्यासाठी जि. प. शाळा सुरू झाल्या. शाळेचा अमृत महोत्सव साजरा होत आहे, ही आनंददायी गोष्ट आहे. आजच्या काळात भाऊ भावाला जमीन देण्यासाठी तयार होत नाही. जमिनी घेण्यासाठी कोर्टात जावे लागते. इथं मात्र जमीनमालकाने शाळेसाठी विनामूल्य जागा दिली. ग्रामस्थांचे हातभार लागले म्हणून शाळा उभी राहली. पूर्वीचे शिक्षण आणि शिक्षक शिस्तबद्ध होते. पालक शिक्षकांना जाब विचारायला जात नव्हते. आजची परिस्थिती उलटी आहे. पालकच शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गैरसोयींबाबत सांगतात. त्यामुळे विद्यार्थी कष्ट करायला तयार नाहीत. शिक्षण कष्टाचा सन्मान करायला शिकवते. स्व. गोविंदराव निकम यांना मानणारा गाव आहे. त्यामुळे भावनांची जाणीव ठेवून शाळेच्या प्रगतीसाठी कायम मदत करत राहीन.
शाळेच्या अमृत महोत्सव समितीतर्फे आमदार शेखर निकम, उद्योजक सचिन पाकळे, शशिकांत दळवी, कृष्णा हरेकर, चंद्रकांत जाधव, वसंत जाधव, शरद शिगवण, सरपंच रवी मते, उपसरपंच संदीप घाग यांच्यासह उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापक भूषण वारे, सहकारी शिक्षक यांचा सचिन कात इंडस्ट्रीकडून आमदार निकम यांच्या हस्ते सत्कार केला गेला. कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक वारे यांनी तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन विजय लोंढे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com