माजी प्राचार्य सुरेश गावडे यांना ‘आदर्श प्राचार्य’ गौरव पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी प्राचार्य सुरेश गावडे यांना ‘आदर्श प्राचार्य’ गौरव पुरस्कार
माजी प्राचार्य सुरेश गावडे यांना ‘आदर्श प्राचार्य’ गौरव पुरस्कार

माजी प्राचार्य सुरेश गावडे यांना ‘आदर्श प्राचार्य’ गौरव पुरस्कार

sakal_logo
By

91901
गोवा : प्राचार्य सुरेश गावडे यांना गौरविताना मान्यवर.

माजी प्राचार्य सुरेश गावडे यांना
‘आदर्श प्राचार्य’ गौरव पुरस्कार
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग सैनिक स्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेजचे माजी प्राचार्य सुरेश गावडे यांना नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन, बेळगाव व इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी, बेळगाव यांच्यातर्फे देण्यात येणारा राष्ट्रीय आदर्श प्राचार्य गौरव पुरस्कार नुकताच पार्सेकर एज्युकेशन सोसायटी, गोवा येथे प्रदान करण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक, शासकीय, निमशासकीय क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून शाश्वत सेवा केल्याबद्दल वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेच्या सन्मानार्थ विधायक व कौतुकास्पद कार्याची दखल राष्ट्रीय पुरस्कार वितरण समिती गोवाने घेतली. दिल्ली, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यांतील निवडक व्यक्तींमधून प्रा. गावडे यांची निवड करून मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र, अभिनंदन पत्र व स्मृतीचिन्ह प्रदान करून पुरस्काराने गौरविण्यात आले. या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
...............
सावंतवाडीत उद्या ‘कन्यासुर कन्यावती’
सावंतवाडी ः शहरातील खासकीलवाडा येथील महापुरुष मंदिरात दरवर्षीप्रमाणे गुरुवारी (ता. ३०) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी विधीवत ‘श्रीं’ची महापूजा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी पावणाई देवी नाट्यमंडळ, माडखोल यांचा ‘कन्यासुर कन्यावती’ हा नाट्यप्रयोग महापुरुष मंदिर शिल्पग्राम जवळ, दळवी यांच्या घराशेजारी होणार आहे. नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गुरू गावडे यांनी केले आहे.