शेर्ले माऊली मंदिराचे ३० ला भूमिपूजन

शेर्ले माऊली मंदिराचे ३० ला भूमिपूजन

91903
शेर्ले ः येथील श्री देवी माऊलीची मूर्ती.

शेर्ले माऊली मंदिराचे ३० ला भूमिपूजन
बांदा ः शेर्ले येथील श्री देवी माऊली रवळनाथ पंचायतन देवस्थानच्या प्रमुख मंदिरातील श्री देवी माऊली मंदिराचा भूमिपूजन समारंभ गुरुवारी (ता.३०) सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यान होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. शेर्ले येथील प्रमुख देवस्थानातील प्रमुख मंदिरे ही सुमारे १५ व्या ते १६ व्या दशकात पूर्वजांनी सांस्कृतिक व सामाजिक बांधिलकीतून उभारली आहेत. मंदिरे १६ व्या शतकातील असत्यामुळे फारच जीर्ण अवस्थेत आहेत. पूर्वजांनी निर्माण केलेला हा भक्तीचा ठेवा, त्याचे जतन करण्यासाठी शेर्ले ग्रामस्थ व मानकरी एकत्र येऊन लोकसहभागातून मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी सुमारे दोन कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. या सुंदर वास्तूच्या भूमिपूजनाचा सोहळा भाविकांच्या उपस्थितीत विधिवत होणार आहे. मंदिर भूमिपूजन सोहळ्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या धार्मिक सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा सोहळा यशस्वी करावा, असे आवाहन देवस्थान प्रमुख मानकरी मंडळी, श्री देवी माऊली रवळनाथ स्थानिक सल्लागार उपसमिती, श्री देवी माऊली-रवळनाथ जीर्णोद्धार मुख्य समितीच्यावतीने केले आहे.
------------
91904
बांदा साई मठात उद्यापासून कार्यक्रम
बांदा ः शहारातील आळवाड्यातील साईभक्त (कै.) बाप्पा केसरकर संस्थापीत साईमठामध्ये गुरूवारी (ता.३०) साई रामनवमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पहाटे ५.३० वाजता साईंची काकड आरती, सकाळी ७.३० वा‌जता साई नित्य पुजा, सकाळी ९ वाजता श्री सत्यदत्त पूजा, दुपारी १२ वाजता साईंची मध्यान्ह आरती, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद व तिर्थप्रसाद, सायंकाळी ६ वाजता साईची सांज आरती, रात्री ७ वाजता भजन, रात्री ९ वाजता साईची शेजारती आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला बुधवारी (ता.२९) रात्री ७.३० वाजता संगीत प्रेमीसाठी संगीत मेजवानी ‘स्वरसंगम’ हा संगीत रजनीचा कार्यक्रम होणार आहे. गायक विठ्ठल केळुसकर, गितेश कांबळी, सिध्दी परब, सिंथेसायजर महेंद्र मांजरेकर, हार्मोनियम सुशांत नाईक, तबला प्रदीप वाळके, पखवाज कुणाल आळवे हे आपली कला सादर करणार आहेत. भाविकांनी कार्यक्रमास उपस्थित राहुन श्री साईचे क्रुपाआशिर्वाद घ्यावेत व तिर्थ प्रसादाचा, महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com