
कणकवलीत उद्या धार्मिक कार्यक्रम
कणकवलीत उद्या
धार्मिक कार्यक्रम
कणकवली ः शहरातील निम्मेवाडी येथील ओम श्री. प. पू चित्स्वरूप फलाहारी महाराज रघुपतीधाम आश्रमात गुरुवारी (ता. ३०) रामनवमी उत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. सकाळी दहाला पादुका पूजन, श्रीरामप्रभूंवर अभिषेक, अकराला जानवली येथील किशोर दौलत राणे यांचे कीर्तन, दुपारी साडेबाराला श्रीराम जन्मोत्सव, दुपारी एकला स्वयंभू मंदिर ते विश्रांतीधामपर्यंत पालखी मिरवणूक, आरती, तीर्थप्रसाद, दुपारी एक ते सायंकाळी चार महाप्रसाद, सायंकाळी सातला भजन होईल.
---------------
उभादांडा येथे
रामनवमी उत्सव
वेंगुर्ले ः उभादांडा-सिद्धेश्वरवाडी येथील प. पू. संत आई नरसुले समाधी मंदिरात रामनवमी उत्सव गुरुवारी (ता. ३०) विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त पहाटे काकड आरती, सकाळी आठला रामचरित्रमानस ग्रंथ वाचन, नऊला मठाधिशाचा नारळ बदली, दहाला होम व सावळाराम कुले बुवा यांचे कीर्तन, दुपारी बाराला रामजन्म, पाळणागीत, आरती व तीर्थप्रसाद, दुपारी एकला महाप्रसाद, सायंकाळी ओंकार भजन मंडळ आडारी, दादा नाईक भजन मंडळ सिद्धेश्वरवाडी, ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ, भेंडमळा व स्थानिक भजनांचा कार्यक्रम होणार आहे.
---------------
वेतोरेत आज
विविध कार्यक्रम
वेंगुर्ले ः वेतोरे-गोसावीमठ येथील श्री देव भूतोबा मंदिरात उद्या (ता. २९) सकाळी साडेनऊला धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त ‘श्रीं’ची महापूजा, दुपारी बाराला आरती, एकला महाप्रसाद, सायंकाळी सहाला हरिभक्त मंडळ, गोसावीमठ यांचा हरिपाठ, सातला महालक्ष्मी प्रासादिक महिला भजन मंडळ, वेतोरे (बुवा अमृता येरम) यांचे भजन, आठला रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, गुरवटेंबवाडी (बुवा रामदास वेतोरकर) यांचे भजन, नऊला श्री देव भूतोबा महापुरुष भजन मंडळ, गोसावीमठ (बुवा अनिल गोसावी) यांचे भजन होणार आहे. त्यानंतर साडेनऊला सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरुर यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.
-----------------
‘इस्कॉन’तर्फे
विविध कार्यक्रम
सावंतवाडी ः आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) सावंतवाडी यांच्यावतीने ३१ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत सावंतवाडी येथील हरे कृष्ण संस्कार केंद्र, भटवाडी येथे सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ३१ ला सायंकाळी सहा ते रात्री नऊ श्री रामजन्म, १ एप्रिलला सायंकाळी ६ ते ९ ‘भरतभेट’, २ एप्रिलला सकाळी अकरा ते दुपारी दोन पर्यंत ‘राम-शबरी भेट’ कार्यक्रम होणार आहे. रामचरित्र अभ्यासक औदार्य गौरप्रभू यांचे व्याख्यान होणार आहे.
-------------------
कणकवलीत उद्या
राम जन्मोत्सव
कणकवली ः बीडवाडी येथील श्री गुरुदेव दत्त मंदिरात गुरुवारी (ता. ३०) राम जन्मोत्सव सोहळा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. सकाळी सातला श्रींची महापूजा, नऊला श्रीराम पंचायतन पूजा, दहाला शोभा मुगणेकर यांचे कीर्तन, दुपारी बाराला श्रीराम जन्मोत्सव सोहळा, त्यानंतर महाआरती, प्रसाद, एकला महाप्रसाद, सायंकाळी पाचला स्थानिक भजनी कलाकारांची भजने होतील.