
सावंतवाडीतील निराधार महिलेस ''सामाजिक बांधिलकी''चा आधार
91898
सावंतवाडी ः खासकीलवाडा येथील निराधार महिला नलिनी पाटणकर यांना संविता आश्रमात दाखल करण्याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचे सदस्य. सोबत इतर.
सावंतवाडीतील निराधार महिलेस
‘सामाजिक बांधिलकी’चा आधार
सावंतवाडी ः खासकीलवाडा येथील निराधार महिला नलिनी पाटणकर (वय ६५) यांना आज सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांकडून पणदूर येथील संविता आश्रममध्ये दाखल करण्यात आले. पाटणकर या वृद्धावस्थेमुळे थकल्या होत्या. तेथील व्यावसायिक सदानंद पवार यांनी याची माहिती सामाजिक बांधिलकीला दिली. सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्त्यांनी तत्काळ दाखल होऊन सर्व परिस्थितीची माहिती घेतली व संविता आश्रमचे संस्थापक संदीप परब यांच्याशी चर्चा करुन त्यांना आश्रमात दाखल केले. सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी व तेथील व्यावसायिक पवार यांनी लोकवर्गणीतून दहा हजार रुपये जमा केले व सामाजिक कार्यकर्ते अॅम्बुलन्स मालक हेमंत वागळे व लक्ष्मण शिरोडकर यांच्या सहकार्याने त्यांना आश्रमात दाखल करण्यात आले. जमलेली दहा हजार रक्कम वृद्ध महिलेच्यावतीने आश्रमला सुपूर्द करण्यात आली. सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव, समीरा खलील, संजय पेडणेकर, शेखर सुभेदार, प्राध्यापक सतीश बागवे, लक्ष्मण शिरोडकर तसेच व्यावसायिक सदानंद परब यांनी पुढाकार घेतला. यावेळी संविता आश्रमचे व्यवस्थापक लवू सावंत व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते.