गुहागर-स्नेहल ओक, नीलेश खेडेकर कबड्डी पंच परीक्षेत यशस्वी

गुहागर-स्नेहल ओक, नीलेश खेडेकर कबड्डी पंच परीक्षेत यशस्वी

rat२८२४.txt

बातमी क्र..२४ (टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
rat२८p२४.jpg ः
..........

91927
स्नेहल ओक
.....

91921
नीलेश खेडेकर
----------------

स्नेहल ओक, नीलेश खेडेकर
कबड्डी पंच परीक्षेत यशस्वी

गुहागर ः शहरामधील स्नेहल ओक व तालुक्यातील अडूर गावातील नीलेश खेडेकर हे राज्यस्तरीय कबड्डी पंच परीक्षेत उत्तीर्ण झाले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने २५ सप्टेंबर २०२२ रोजी राज्यस्तरीय पंच परीक्षा घेतली होती. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात खेड, दापोली, संगमेश्वर व रत्नागिरी अशा चार परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली होती. त्यामध्ये खेड केंद्राने राज्यात सर्वाधिक बाजी मारली. खेड केंद्रातील परीक्षार्थी स्वप्निल बैकर राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. गुहागर शहरातील स्नुषा स्नेहल ओक तसेच अडूर गावातील श्री विठ्ठलाईदेवी ग्रामविकास मंडळाचे सदस्य नीलेश खेडेकर या परीक्षेत उत्तीर्ण झाले. राज्यस्तरीय कबड्डी पंच परीक्षेत गुहागर तालुक्यातून समीर जांगळी, समित घाणेकर यांच्यानंतर ओक व खेडेकर यांनी यश मिळवले. याबद्दल रत्नागिरी जिल्हा व गुहागर तालुका कबड्डी असोसिएशन यांच्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
..................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com