खारेपाटण कोंडवाडी येथे 
अज्ञाताने बंद घर फोडले

खारेपाटण कोंडवाडी येथे अज्ञाताने बंद घर फोडले

91964
खारेपाटण : येथील बंद घर अज्ञातांनी फोडले.


खारेपाटण कोंडवाडी येथे
अज्ञाताने बंद घर फोडले

आहेरासह इतर रक्कमेवर डल्ला

खारेपाटण, ता.२८ : शहरातील कोंडवाडी येथील बंद घराचा कडीकोयंडा, कपाट तोडून आतील रोख रक्‍कम अज्ञातांनी चोरून नेली. सोमवारी रात्री ही घटना घडल्‍याची शक्‍यता आहे. या प्रकरणी घरमालक वसंत गोविंद चाफे (वय ७०) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
मूळचे बांदिवडे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील रहिवासी असलेले वसंत गोविंद चाफे हे ८ ते १० वर्षांपासून खारेपाटण कोंडवाडी येथे स्थायिक आहेत. तसेच मुंबई गोवंडी येथे देखील ते आपल्या कुटुंबासह राहत आहेत. अधून मधून आपल्या खारेपाटण येथील गावच्या घराकडे ते येत असतात. आज मंगळवारी २८ रोजी मुंबईवरून ते गावी खारेपाटणला सकाळी सातला आले. त्‍यावेळी त्यांच्या घराचा दरवाजा कडीकोयंडा त्यांना तुटलेला दिसला. आत प्रवेश केला असता घरातील कपड्यांचे कपाट आणि त्‍यामधील लॉकर तोडून कागदपत्रांसह कपडे विस्कटलेले आढळले. कपाटातील एक हजारांची सुटी रक्कमही अज्ञाताने चोरल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच आहेराची पाकिटे फाडून त्यातील देखील रक्कम चोरट्यांनी नेली असल्याचे आढळून आले. सदर घटना लक्षात येताच वसंत चाफे यांनी तातडीने खारेपाटण पोलिसपाटील दिगंबर भालेकर यांना घटनेची माहिती दिली. तसेच श्री. चाफे यांनी खारेपाटण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस कर्मचारी उद्धव साबळे व पराग मोहिते अधिक तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com