सावंतवाडीत निसर्ग छायाचित्र स्पर्धा

सावंतवाडीत निसर्ग छायाचित्र स्पर्धा

91975
बंडोपंत भिसे

सावंतवाडीत निसर्ग छायाचित्र स्पर्धा
सावंतवाडी, ता. २८ ः येथील भारत फोटो स्टुडिओचे प्रसिद्ध छायाचित्रकार बंडोपंत उर्फ मुरलीधर भिसे यांच्या स्मरणार्थ अनिल भिसे मित्रमंडळातर्फे खुल्या निसर्ग छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी एकच छायाचित्र गुरुवारपर्यंत (ता. ३०) संतोष परब यांच्याकडे पाठवायचे आहे. त्यासोबत स्वतःचे नाव, छायाचित्राचे लोकेशन आवश्यक आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिकांसह सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन अभिमन्यू लोंढे, हेमंत केसरकर, संजय म्हापसेकर, जतिन भिसे, गणेश हरमलकर, रत्नाकर माळी, दीपक गावकर, अनिल कुडाळकर, मोहन जाधव, अजय मडगावकर, बेंजामिन फर्नांडीस, संतोष सावंत, मयूर चराटकर, प्रवीण मांजरेकर, राजेश मोंडकर, विजय राऊत यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com