शिर्डीतही कामथेतील माटेंची राधा ठरली सरस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिर्डीतही कामथेतील माटेंची राधा ठरली सरस
शिर्डीतही कामथेतील माटेंची राधा ठरली सरस

शिर्डीतही कामथेतील माटेंची राधा ठरली सरस

sakal_logo
By

- ratchl२८३.jpg ः
९१९३४
चिपळूण ः महापशुधन प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावणारी राधा गाय.
-
महापशुधन प्रदर्शनात ‘राधा’ ठरली सरस

शिर्डीत प्रदर्शन ; दोन दाती गोसंवर्धन गटात प्रथम क्रमांक

चिपळूण, ता. २८ ः कामथेचे माजी सरपंच डॉ. विजय माटे व विद्याताई माटे यांच्या कामथे येथील कामधेनू गोशाळेतील ‘राधा’ ही गाय शिर्डी येथील महापशुधन एक्स्पो प्रदर्शनातही सरस ठरली. या काजली खिलार गाईने दोन दाती गोसंवर्धन गटात प्रथक क्रमांकाचा मान पटकावत चिपळूण तालुक्याच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या यशाबद्दल गाईचे मालक डॉ. विजय माटे यांची भेट घेत आमदार शेखर निकम यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
पशुसंवर्धन विभागाच्यावतीने शिर्डी येथे तीन दिवसांचे महापशुधन एक्स्पो प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात डॉ. विजयशेठ बाळासाहेब माटे यांच्या राधा या काजली खिलार गाईने दोन दाती गोसंवर्धन गटात प्रथम क्रमांक मिळवला. फेब्रुवारी महिन्यात कोल्हापूर येथील श्री सिद्धगिरी महासंस्थान कणेरीमठ तसेच भा. कृ. अ. प. श्री सिद्धिगिरी कृषिविज्ञान केंद्र आणि पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने पंचमहाभूत लोकोत्सवादरम्यान आयोजित केलेल्या भव्य पशुप्रदर्शनातही राधा गाईने दोन दाती गटात प्रथम क्रमांक पटकावला होता. आता शिर्डी येथील प्रदर्शनातही प्रथम क्रमांक पटकावल्याने आमदार शेखर निकम यांनी डॉ. माटे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी दादू गुढेकर, प्रल्हाद यादव, रोहन इंगावले आदी उपस्थित होते.