आमदार निकमांनी जाणल्या पागवासियांच्या समस्या

आमदार निकमांनी जाणल्या पागवासियांच्या समस्या

- ratchl२८२.jpg ः
L९१९२३
चिपळूण ः पाग येथील नागरिकांशी चर्चा करताना आमदार शेखर निकम.
-
चौपदरीकरणामुळे पागवासीयांसमोर अनंत अडचणी

आमदार निकमांनी साधला संवाद ; रस्ता ओलांडण्याची सुविधा नाही
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २८ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणामुळे पाग परिसरातील नागरिकांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभागाकडे उड्डाणपुलासह विविध मागण्यांचे निवेदन दिले होते. या धर्तीवर आमदार शेखर निकम यांनी सोमवारी पाग पॉवरहाऊस परिसरात सुरू असणाऱ्या कामाची पाहणी करत पागवासियांच्या समस्याही जाणून घेतल्या. लवकरच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले.
शहरातील पाग परिसरात मोठी लोकवस्ती आहे. या भागात महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असले तरी लोकांना रस्ता ओलांडण्यासाठी कोणती उपाययोजना करण्यात आली आहे या संदर्भात कोणतीच कल्पना स्थानिक नागरिकांना देण्यात आलेली नाही. सद्यःस्थितीत महामार्गाच्या कामांतर्गत सर्व्हिस रोड करण्यात आले आहेत; मात्र एकच सर्व्हिस रोड असल्याने भविष्यात या रस्त्यावरची वाहतूक वाढणार असल्याने येथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याच पार्श्‍वभूमीवर पाग येथील सामाजिक कार्यकर्ते जगदीश गोरिवले व सहकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभागाला निवेदन देऊन आपल्या समस्या मांडताना त्यातून या भागात उड्डाणपूल किंवा अन्य उपाययोजना करण्यासंदर्भात मागणी केली होती.
काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांनीही गोरिवले व स्थानिकांची भेट घेतली होती; मात्र त्यांना समर्पक उत्तरे देता आली नाहीत. सोमवारी (ता. २७) आमदार शेखर निकम यांनी पाग पॉवरहाऊस येथे जाऊन पागवासीयांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पाग पॉवरहाऊस येथे जंक्शन उभारले जाणार आहे; मात्र त्याचे डिझाईन अद्याप फायनल झाले नसल्याची माहिती त्यांच्याकडून नागरिकांना मिळाली. या वेळी सर्कल कशा प्रकारे असणार त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या चौकात प्राणहानी झाली तर त्याला जबाबदार कोण, असे प्रश्‍न गोरिवले, शालन तटकरे, गणेश खेडेकरे, विवेक गिजरे, नयनेश तांबडे, संजय तांबडे, सुर्वे यांनी उपस्थित केले. यावर लवकरच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष परिसराची पाहणी करण्यात येईल, असे आश्‍वासन आमदार निकम यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com