दाभोळ ःदापोलीतील 176 गावांसाठी केवळ चार वनरक्षक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ ःदापोलीतील 176 गावांसाठी केवळ चार वनरक्षक
दाभोळ ःदापोलीतील 176 गावांसाठी केवळ चार वनरक्षक

दाभोळ ःदापोलीतील 176 गावांसाठी केवळ चार वनरक्षक

sakal_logo
By

दापोलीतील १७६ गावांसाठी
केवळ चार वनरक्षक
अपुरे कर्मचारी ; जंगलाकडे लक्ष ठेवणे होते जिकीरीचे
दाभोळ, ता. २८ ः वनराईने नटलेल्या मात्र असंख्य वन्यप्राण्यामुळे त्रस्त असलेल्या दापोली तालुक्यात फक्त चारच वनरक्षक कार्यरत आहेत. तालुक्यात मोठे वनक्षेत्र असल्याने शासकीय मालकीच्या जंगलाकडे लक्ष ठेवणे कठीण होत असल्याने दापोली तालुक्यात वनरक्षकांची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दापोली वनविभागात १ वनपाल, ४ वनरक्षक व १ कार्यालयीन कर्मचारी असून, या ४ वनरक्षकांमध्ये प्रत्येकी सुमारे ४० गावे आहेत. त्यामुळे या वनरक्षकांवर कामाचा ताण पडत आहे. दापोली तालुक्यात वन्यप्रण्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यासाठी आमदारांसह शेतकऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. अशी परिस्थिती दापोलीत असतानाही तालुक्याला फक्त ४ वनरक्षक नियुक्त आहेत. बिबट्या दिसून आल्यावर वारंवार पहारा देणे, इतर वन्यप्राण्यांचा त्रास, वृक्षतोड, वन्यप्रण्यांची शिकार करणाऱ्यांना पकडणे, वन्यप्राण्यांनी पाळीव प्राण्यांची हत्या केल्यास त्याचा घटनास्थळी जाऊन पंचनामा करणे आदी अनेक कामे या वनरक्षकांवर सोपवण्यात आली आहेत.
दापोली तालुक्यातील १७६ गावे असून, या गावांसाठी केवळ ४ वनरक्षक आहेत. या चारजणांवर १७६ गावांच्या वनांची व त्यातील प्राण्यांच्या रक्षणाची जबाबदारी आहे; मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे त्यांना दैनंदिन गस्त घालणेही शक्य होत नाही. तालुक्यातील गावे व वनरक्षक यांचे प्रमाण व्यस्त असल्यामुळे बेकायदा शिकार करणाऱ्यांचेही फावले आहे.