
रत्नागिरी- सदिच्छा समारंभ
फोटो ओळी
-rat28p37.jpg-KOP23L91965 रत्नागिरी ः कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात आयोजित कार्यक्रमात बोलताना विनायक हातखंबकर. सोबत गीता सावंत, बंडबे, प्राजक्ता कदम, दादा कदम आदी.
आनंददायी शिक्षणाकडे भारत शिक्षण मंडळाचे लक्ष
आगाशे विद्यामंदिर ; चौथीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा
रत्नागिरी, ता. २८ ः आनंददायी शिक्षण देण्याकडे भारत शिक्षण मंडळाचे विशेष लक्ष आहे. त्यामुळे बालवाडी ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी व पालकही आनंदित असल्याचे दिसते. चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ असला तरी आपल्या संस्थेचे पटवर्धन हायस्कूल आणि संजीवन गुरूकुल प्रकल्प सुरू आहे. विद्यार्थ्यांनी याच शाळेत प्रवेश घेऊन आपले उज्ज्वल भविष्य सुरक्षित करावे, असे आवाहन कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिरचे प्रबंधक विनायक हातखंबकर यांनी केले.
आगाशे विद्यामंदिरात आज चौथीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी दादा कदम, सतीश दळी, मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम, शिक्षक बंडबे,गीता सावंत, मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे, पर्यवेक्षक सत्यवान कोत्रे, मनोज जाधव, मुख्याध्यापिका प्रमोदिनी शेट्ये आदीं उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांनी दहीहंडी, सहल, निवासी शिबिर, आनंद बाजार अशा विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
विद्यार्थिनी खुशी केळकर, आर्या रहाटे, पूजा पेडणेकर, अवनी नागवेकर, आर्या कुंभार, अंश भावे, अन्वय कुवळेकर व श्लोक जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. दत्तात्रेय नार्वेकर याने हार्मोनियमवर गीत वाजवले तर धैर्या गवाणकर हिने ‘हीच अमुची प्रार्थना’ हे गीत सादर केले. वैदेही भिंगारे यांनी मनोगत व्यक्त केले. भारत शिक्षण मंडळाच्या संजीवन गुरूकुल आणि पटवर्धन हायस्कूलची माहिती देण्यात आली. मंजिरी गुणे यांनी सूत्रसंचालन केले. सुधीर शिंदे यांनी आभार मानले.