राजापूर-कोदवली नदीपात्र 15 एप्रिलपर्यंत गाळमुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-कोदवली नदीपात्र 15 एप्रिलपर्यंत गाळमुक्त
राजापूर-कोदवली नदीपात्र 15 एप्रिलपर्यंत गाळमुक्त

राजापूर-कोदवली नदीपात्र 15 एप्रिलपर्यंत गाळमुक्त

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat२८p४५.jpg ः KOP२३L९२००९ राजापूर ः कोदवली नदीपात्रातील झालेला गाळ उपसा.

कोदवली नदीपात्र १५ एप्रिलपर्यंत गाळमुक्त
राजापूर, ता. २८ ः शहरातील कोदवली नदीपात्रातील आयटीआय कॉलेज ते जवाहर चौक नन्हेसाहेब पुलापर्यंतचे गाळ उपशाचे काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर कोदवली धरणातील गाळ उपशाचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती नाम फाउंडेशनचे कोकण विभाग समन्वयक समीर जानवलकर यांनी गाळ निर्मुलन समितीच्या बैठकीमध्ये दिली.
कोदवली नदीपात्रात उपसण्यात आलेला गाळ आंबा बागायतदार व ज्यांना हवा असेल, त्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असून वाहतूक खर्च करून हा गाळ इच्छुकांनी घेऊन जावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
गाळ निर्मुलन समितीच्या अध्यक्ष वैशाली माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला समिती सचिव तथा मुख्याधिकारी प्रशांत भोसले, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, नाम फाउंडेशनचे समीर जानवलकर, राजेश्वर देशपांडे आदींसह उपस्थित होते. बैठकीत गाळ उपसा आणि वाहतुकीबाबत नियोजन करण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. नाम फाउंडेशनकडून सुरू असलेल्या कोदवली नदीपात्रातील आयटीआय कॉलेज ते जवाहर चौक नन्हेसाहेब पुलापर्यंतच्या गाळ उपशाचे काम सुरू आहे. त्यापैकी सुमारे ७०-७५ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती जानवलकर यांनी दिली. उपसलेल्या गाळाची वाहतूक होणे आवश्यक असून, ज्यांना बागेत भरावासाठी गाळ हवा आहे त्यांनी नगर पालिका प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रांताधिकारी माने यांनी केले. केवळ वाहतूक खर्च घेऊन हा गाळ देण्यात येणार असल्याचे या वेळी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. गाळ उपशासाठी आवश्यक असलेल्या निधी संकलनाचाही आढावा घेण्यात आला. अद्यापही निधीची आवश्यकता असून, जनतेने गाळ उपशासाठी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहनही या वेळी