दाभोळ ः दापोली नगरपंचायतीच्या अर्थसंकल्पावर आक्षेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ ः दापोली नगरपंचायतीच्या अर्थसंकल्पावर आक्षेप
दाभोळ ः दापोली नगरपंचायतीच्या अर्थसंकल्पावर आक्षेप

दाभोळ ः दापोली नगरपंचायतीच्या अर्थसंकल्पावर आक्षेप

sakal_logo
By

दापोली नगरपंचायतीच्या अंदाजपत्रकावर आक्षेप

अनेक खर्च अनावश्यक; विरोधकांनी काढल्या ३६ त्रुटी

दाभोळ, ता. २८ ः दापोली नगरपंचायतीचे अंदाजपत्रक नुकतेच सादर करण्यात आले; मात्र यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला असून, मुख्याधिकाऱ्यांकडे आपल्या लेखी हरकती नोंदवल्या आहेत. अंदाजपत्रकातील अनेक खर्च हे अनावश्यक असल्याचे, तर काही खर्च यापूर्वीच बंद झाले असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
दापोली नगरपंचायतीचे अंदाजपत्रक फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नगरपंचायतीच्या सभागृहात सादर करण्यात आले; मात्र त्याची प्रत सदस्यांना आदल्या दिवशी सायंकाळी मिळाल्याने यावर चर्चा व अभ्यास करण्यासाठी वेळ मिळाला नसल्याचे कारण सांगत विरोधकांनी या सभेतून सभात्याग केला होता. यानंतर विरोधकांनी अंदाजपत्रकातील ३६ त्रुटी काढून त्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी कळवल्या आहेत. यावर मुख्याधिकारी काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सामान्य प्रशासन वसुली या लेखाशीर्षाकरिता ५ कोटी २२ हजार ४५० रुपये खर्च, सार्वजनिक सुरक्षिततेकरिता २३ लाख ५ हजार ६००, सार्वजनिक आरोग्यावर १ कोटी ५३ लाख ६७ हजार, सार्वजनिक शिक्षणाकरिता केवळ ४००, अंशदानाकरिता ६५ लाख, संकिर्णकरिता ४५ लाख ६ हजार २०० रुपये असा एकूण ७ कोटी ८७ लाख ६५० महसुली खर्च असणारे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यातील अनेक लेखाशिर्षांना विरोधी सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. यातील अनेक खर्च हे अनावश्यक असल्याचे, तर काही खर्च यापूर्वीच बंद झाले असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी याबाबत दापोली नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात आपल्या हरकती कळवल्या आहेत. आता मुख्याधिकारी अंदाजपत्रकात कोणते बदल करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
चौकट
९ कोटी ४१ लाखाचा अर्थसंकल्प सादर
या सभेत ९ कोटी ४१ लाख १ हजार ५०० रुपये एकूण महसूल जमा रकमेचा व ७ कोटी ८७ लाख ६५० एकूण महसुली खर्चाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यामध्ये कर व दर या लेखशीर्षाखाली ४ कोटी ११ लाख १० हजार १०० रुपये, विशेष अधिवसुली या लेखाशीर्षाखाली ८९ लाख ८५ हजार २००, मिळकतीपासूनचा महसूल २९ लाख १९ हजार ५००, अनुदान २ कोटी ८९ लाख ६५ हजार ५००; तर संकीर्ण १ कोटी १२ लाख २० हजार ४०० असा ९ कोटी ४१ लाख १ हजार ५०० रुपये महसुली जमा असणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.