सागर रक्षकांमुळे किनारे सुरक्षित

सागर रक्षकांमुळे किनारे सुरक्षित

92052
वेंगुर्ले : सागर रक्षकांना टी-शर्ट वाटप करताना पोलिस महासंचालक प्रवीण पवार. शेजारी पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलिस निरीक्षक अतुल जाधव आदी.

सागर रक्षकांमुळे किनारे सुरक्षित

महासंचालक प्रवीण पवार; वेंगुर्लेत पोलिस प्रशासनाचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २८ ः तालुक्याला समुद्र किनारपट्टी लाभली आहे. अनेक देश-विदेशातील पर्यटक या ठिकाणी भेटी देतात. यामुळे समुद्र किनारे सक्षम होण्यासाठी सागर रक्षक सक्षम होणे आवश्यक आहे. पूर्वी सागरी मार्गाने बरेच आतंकवादी हल्ले झाले असून यामुळे अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. सागर रक्षकांना सक्षम करण्यासाठी वेंगुर्ले पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी उचललेली पावले कौतुकास्पद आहेत. येथील पोलिस ठाण्याचे काम अंतर्गत व बाह्यदृष्ट्या उत्कृष्ट असल्याचे गौरवोद्गार कोकण परिक्षेत्राचे महासंचालक प्रवीण पवार यांनी येथे काढले.
पोलिस महासंचालक पवार यांनी आज येथील पोलिस ठाण्याला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांचे वेंगुर्ले पोलिसांतर्फे पोलिस निरीक्षक अतुल जाधव व टीमने सलामी देऊन स्वागत केले. यानंतर महासंचालक पवार यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, वेंगुर्ले पोलिस निरीक्षक जाधव यांच्यासमवेत पोलिस ठाण्यातील सर्व विभाग, बीट, अंमलदार कक्ष, सीसीटीव्ही स्क्रीन, नागरिकांना मार्गदर्शन व माहिती अंतर्गत लावण्यात आलेली भित्तीचित्रे तसेच फलक आणि पोलिस ठाण्याबाहेरील परिसर व भित्तीचित्रांची पाहणी केली. त्यानंतर महासंचालक पवार यांनी सर्व अंमलदार दर्जाच्या पोलिसांना मार्गदर्शन केले. त्यांचे वेंगुर्ले पोलिस ठाण्यात आगमन होताच पोलिस निरीक्षक जाधव यांनी त्यांच्यासह जिल्हा पोलिस अधीक्षक अग्रवाल यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत, सदस्य भरत सातोस्कर, योगेश तांडेल, मॅक्सी कार्डोज, वेंगुर्ले पोलिस ठाण्याच्या महिला दक्षता समिती सदस्या तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सचिव व वेंगुर्ले माजी नगराध्यक्ष नम्रता कुबल, जिल्हा परिषद माजी सदस्य सुकन्या नरसुले, शिवसेनेच्या माजी पदाधिकारी मंजुषा आरोलकर, शीतल साळगावकर, शबाना शेख, सिंधुदुर्ग जिल्हा शांतता समितीचे सदस्य श्रीनिवास गावडे, सामाजिक कार्यकर्ते राजेश परब, जयराम वायंगणकर आदींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
.................
चौकट
सागर रक्षकांना टी-शर्टचे वाटप
समुद्र किनारा सक्षम होण्याच्या दृष्टीने येथील सागर रक्षकांना पोलिसांचे चिन्ह असलेल्या टी-शर्टचे वाटप येथील पोलिस ठाण्यामार्फत महासंचालक पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सागर रक्षक हे पोलिसांचे सहकारी आहेत, हे नागरिकांनी लक्षात घेऊन विविध सूचना देताना सोपे जावे, या उद्देशाने ७० सागर रक्षकांना टी-शर्ट वाटप करण्यात आले. किनारी भागात असलेल्या गावांना भेटी देऊन जास्तीत जास्त सागर रक्षक नेमण्याचा दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे पोलिस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com