कणकवलीत बंधाऱ्यातील 
पाणी पातळी खालावली

कणकवलीत बंधाऱ्यातील पाणी पातळी खालावली

92095
कणकवली ः शहरातील मराठा मंडळ येथील बंधाऱ्यातील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे.

कणकवलीत बंधाऱ्यातील
पाणी पातळी खालावली

मार्चमध्येच घट; टंचाईची भीती

कणकवली,ता.२९ ः उन्हाचा पारा जसजासा तापत आहे. तशी भुगर्भातील पाणी पातळी कमी होत आहे. परिणामी गडनदी पात्रातील केटीवेअरच्या पाणी पातळीत कामलाची घट होत आहे. त्यामुळे यंदा शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. शिवडाव धरणाचे पाणी मे महीण्यात सोडण्यासाठी प्रशासनाला आजपासून तयारी करावी लागणार आहे.
यंदा अवकाळी पावसामुळे हवामानाचे कालचक्र बदलले आहे. याचा परिणाम जसा आंबा, काजूसह कोकण मेवा उत्पादनावर झाला. तसा नैसर्गिक बदल भूगर्भातही झाला आहे. वाढत्या तापमानामुळे पाणी पातळी म्हणजे भूजलस्तर कमी होत आहे. नैसर्गीक पाणीसाठे गोठत आहेत. नदी नाल्यांच्या पाणी पातळी झपाट्याने घटत आहे. यंदा मार्च महिन्यातच तापमाणात वाढ झाली आहे. अजून एप्रिल आणि मे असे दोन महिने उखाड्याचे जाणार आहेत. पाणी पातळीत घट झाल्यास यंदा विहिरीच्या पातळीत घट होणार आहे. याचा सर्वाधिक परिणाम नळपाणी पुरवठा योजनांवर होणार आहे. तालुक्यातील बहुतांश नळपाणी योजना या गडनदी पात्रातील साठ्यावर अवलंबून आहेत; पण यंदा बंधाऱ्यातीलच पाणी साठा कमी होत असल्याने भविष्यात टंचाईची भीती व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com