पोलिस अधीक्षक अग्रवाल यांच्या
प्रभावी तपासामुळे आरोपीला शिक्षा

पोलिस अधीक्षक अग्रवाल यांच्या प्रभावी तपासामुळे आरोपीला शिक्षा

92114
सौरभ अग्रवाल

पोलिस अधीक्षकांच्या प्रभावी
तपासामुळे एकाला कारावास

जळगावातील प्रकरण, कामगिरीचे कौतुक

ओरोस, ता. २९ ः जिल्ह्यातील अवैध दारूसह विविध गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावणारे पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांची आणखी एक कौतुकास्पद कामगिरी समोर आली आहे. त्यांनी जळगाव जिल्ह्यातील चोपडा पोलिस ठाण्यातील दाखल गुन्ह्याचा तत्कालीन अधीक्षकपदी कार्यरत असताना केलेल्या यशस्वी तपासामुळे पोक्सोसह जीवघेणा हल्ला व बलात्काराच्या खटल्यातील आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. देवेंद्र राजेंद्र भोई (रा. वैजापूर, रा. चोपडा), असे आजन्म कारावास झालेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्याचा निकाल काल (ता. २८) लागला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विद्यमान पोलिस अधीक्षक अग्रवाल यांनी सिंधुदुर्गात पदभार सांभाळण्याआधी जळगाव जिल्ह्यात अधीक्षकडीपदी सेवा बजावली आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा पोलिस ठाण्यात २०१९ मध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर जीवघेणा हल्ला करत बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात पीडित अल्पवयीन युवतीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीनुसार आरोपी देवेंद्र भोई याच्या विरोधात पोक्सोनुसार गुन्हा दाखल करून अटक केली होती. महिला पोलिस उपनिरीक्षक अर्चना करपुडे यांनी सुरुवातीला तपास केला होता. त्यानंतर तत्कालीन अधीक्षक अग्रवाल यांनी या गुन्ह्याचा अधिक सखोलपणे तपास करून आरोपीविरोधात गुन्हा सिद्ध होईल, असे वस्तुस्थितीदर्शक पुरावे गोळा करत न्यायालयात सरकारी वकिलांमार्फत सादर केले होते. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने सरकारी अभियोक्ता के. एल. बागुल यांनी यशस्वी युक्तिवाद केला. सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर अमळनेर न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी आरोपी देवेंद्र भोई याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणी पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस फौजदार उदयसिंग साळुंखे यांनी काम पाहिले. अधीक्षक अग्रवाल यांच्या या दमदार कामगिरीचे सिंधुदुर्ग तसेच जळगाव पोलिस दलात कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com