ग्रामसेवक, शिक्षक पतसंस्थांच्या निवडणुका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामसेवक, शिक्षक पतसंस्थांच्या निवडणुका
ग्रामसेवक, शिक्षक पतसंस्थांच्या निवडणुका

ग्रामसेवक, शिक्षक पतसंस्थांच्या निवडणुका

sakal_logo
By

92200

पंचवार्षिक लढतींसाठी हालचाली

मतदार यादीही निश्चित; ग्रामसेवक, शिक्षक पतसंस्थांच्या निवडणुका

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २९ ः जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था आणि जिल्हा माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था या दोन्ही पतसंस्थांच्या पंचवार्षिक निवडणूक हालचाली सुरू झाल्या आहेत. दोन्ही संस्थांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ग्रामसेवक पतसंस्थेसाठी ३२१ तर माध्यमिक शिक्षकसाठी १७७८ मतदार प्रारूप मतदार यादीत निश्चित झाले आहेत.
जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने सोमवारी (ता.२७) या दोन्ही संस्थांची प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. यावर ५ एप्रिलपर्यंत हरकती घेण्याची मुदत देण्यात आली आहे. ग्रामसेवक पतपेढी निवडणुकीसाठी ३२१ मतदार प्रारूप यादीत निश्चित झाले आहेत. या पतसंस्थेसाठी एकूण १३ संचालक निवडून द्यायचे आहेत. यात सर्वसाधारण मतदार संघातून आठ संचालक निवडले जाणार आहेत. पाच संचालक आरक्षित आहेत. यात दोन महिला प्रतिनिधी, एक इतर मागास प्रवर्ग, एक विमुक्त व भटक्या जाती जमाती आणि एक अनुसूचित जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग यातून निवडले जाणार आहेत.
जिल्हा माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था यासाठी १७७८ मतदार प्रारूप यादीत निश्चित झाले आहेत. या संस्थेसाठी एकूण १५ संचालक निवडून द्यायचे आहेत. यामध्ये आठ तालुका मतदार संघातून आठ संचालक निवडले जाणार आहे. सात मतदार संघ जिल्हा मतदारसंघ आहेत. यात सर्वसाधारण दोन संचालक, दोन महिला संचालक निवडले जाणार आहेत. एक इतर मागास प्रवर्ग, एक विमुक्त व भटक्या जाती जमाती आणि एक अनुसूचित जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग यातून निवडले जाणार आहेत.
--------
चौकट
प्राथमिक शिक्षकसाठी २९८२ मतदार अंतिम
जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी या संस्थेची अंतिम मतदार यादी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये २९८२ मतदार निश्चित झाले आहेत. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्याने पुढील दहा ते पंधरा दिवसांत निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे प्राथमिक शिक्षकांतील वातावरण तापू लागले आहे. शिक्षक मतदारांना आपलेसे करण्यासाठी सर्व संघटना सरसावल्या आहेत. गाठी भेटी सुरू झाल्या आहेत. काही संघटनांनी मेळावे घेण्यात सुरुवात केली आहे.
------------
माध्यमिक शिक्षक पतपेढी (तालुकानिहाय निश्चित मतदार)
तालुका*मतदार संख्या
वैभववाडी*९६
कणकवली*३१०
देवगड*२८७
मालवण*२९१
कुडाळ*१८१
वेंगुर्ले*१७६
सावंतवाडी*३२०
दोडामार्ग*११७