वीज दरवाढीला आपचा विरोध

वीज दरवाढीला आपचा विरोध

वीज दरवाढीला
आपचा विरोध
रत्नागिरी ः आम आदमी पक्षाच्या रत्नागिरी जिल्हा समितीतर्फे वीज दरवाढीविरोधात रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आधीच महागाईच्या आगीत भाजून निघत असताना वीज दरवाढीचा हा झटका जनतेला सहन होणार नाही. त्यामुळे दरवाढ नकोच मात्र पंजाब, दिल्ली सरकारप्रमाणेच राज्यातही मोफत वीजपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. महामंडळाचे कॅग ऑडिट करण्याची मागणी पक्षाचे जिल्हा अंतरिम संयोजक परेश साळवी यांनी केली आहे. या वेळी पक्षाचे रत्नागिरी जिल्हा संयोजक परेश साळवी, संगमेश्वर तालुका संयोजक सचिन आपिष्टे, राजापूर तालुका संयोजक हबीब सोलकर, नाटे संयोजक अझीम मिरकर व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
--------
दोन गाड्यांना
जादा डबे
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या हापा-मडगाव एक्सप्रेस तसेच हिसार ते कोईमतूर दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक एक्सप्रेसला अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वेने या गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात कोकण रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार हापा मडगाव या गाडीला हापा येथून २९ मार्चपासून तर मडगाव ते हापा दरम्यान धावताना ३१ मार्च पासून स्लीपर श्रेणीचा एक डबा वाढीव जोडला जाईल. याचबरोबर हिसार ते कोईमतुर दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक एक्सप्रेसला हिसार येथून सुटताना ५ ते २६ एप्रिल या कालावधीत तर कोयमतुर ते हिसार या फेरीसाठी ८ ते २९ एप्रिल या कालावधीसाठी टू टायर वातानुकूलित श्रेणीचा एक जादा डबा जोडला जाणार आहे. उन्हाळी हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांना गर्दी होऊ लागली आहे. यामुळे अनेक गाड्यांची प्रतीक्षा यादी वाढू लागली आहे. रेल्वेने काही गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com