
14 लाखाचा कर थकवणारे दोन टॉवर सील
- rat२९p१.jpg-
९२१०१
रत्नागिरी ः शहरातील मारूती मंदिर येथील बीएसएनएलचा टॉवर पालिकेच्या वसुली पथकाने सील केला.
-
रत्नागिरी पालिकेकडून दोन टॉवर सील
१४ लाखाची थकबाकी ; १ एप्रिलला थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध
रत्नागिरी, ता. २९ ः घरपट्टी आणि पाणीपट्टी थकवणाऱ्यांवर पालिकेच्या पथकांनी कर वसुलीसाठी कठोर कारवाई सुरू केली आहे. यामध्ये अनेक वर्षांपासून सुमारे १४ लाखाचा कर थकवणाऱ्या बीएसएनएल कंपनीसह खासगी कंपनीचा टॉवर पथकाने सील केला आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांची गैरसोय झाली आहे. अखेरच्या दोन दिवसात ही कारवाई सुरू राहणार असून, १ एप्रिलला थकबाकीदारांची नावे पालिका प्रसिद्ध करणार आहे.
घरपट्टी, पाणीपट्टीसह अन्य कर वसुलीसाठी पालिकेची स्वतंत्र सात पथके फिरत आहेत. पाणीविभागाचे पथक स्वतंत्र असून, पथके वसुली मोहिमेत व्यस्त आहेत. कंपनीने आता कठोर निर्णय घेत मालमत्ता सील करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यानुसार अनेक वर्षांपासून कर थकलेल्या मारूती मंदिर येथील बीएसएनएलचा टॉवर काल सील करण्यात आला. या टॉवरचा सुमारे ११ लाखाचा कर थकित आहे तर अन्य खासगी एटीसी कंपनीकडे ३ लाख ९५ हजार थकबाकी आहे. वारंवार नोटिसा देऊनही थकबाकी न भरल्याने पालिकेच्या वसुली पथकाने कारवाई करत हे दोन्ही टॉवर सील केले आहेत. आतापर्यंत थकबाकीदार असलेल्या ७१ नळजोडण्या आणि ११२ मालमत्ता पालिकेने सील केल्या आहेत. प्रशासन अधिकारी आणि मुख्याधिकारी तुषार बाबर, उपमुख्याधिकारी प्रवीण माने यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली पथकांकडून ही कारवाई सुरू आहे.