मालवण व्यापारी संघ निवडणूक बिनविरोध

मालवण व्यापारी संघ निवडणूक बिनविरोध

92196
मालवण ः व्यापारी संघाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले सदस्य व पदाधिकारी.


युवा चेहऱ्यांनाही कार्यकारिणीत संधी
अध्यक्षपदी उमेश नेरुरकर; मालवण व्यापारी संघ निवडणूक बिनविरोध

मालवण, ता. २९ : मालवण व्यापारी संघाची २०२३-२८ या पाच वर्षांसाठी निवड बिनविरोध करण्यात आली. यात व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी उमेश नेरुरकर यांची फेरनिवड करण्यात आली. सलगपणे २५ वर्षे नेरूरकर हे मालवण व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत. कार्यकारिणीमध्ये युवा चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली. यावर्षीचा व्यापारी मेळावा मालवण येथे होत असल्याने शहर व्यापारी कार्यकारिणीच्या निवडीला महत्त्व प्राप्त झाले होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्यापारी महासंघाचे पदाधिकारी अरविंद नेवाळकर यांनी काम पाहिले. मालवण व्यापारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा हनुमान मंदिर, सोमवारपेठ येथे झाली. तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रमोद ओरसकर यांच्या अध्यक्षतेखाली संघाची निवडणूक घेण्यात आली. कार्यकारिणीसाठी एकास एक उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने निवड प्रक्रिया बिनविरोध झाली. प्रमोद ओरसकर, उमेश नेरुरकर, नितीन वाळके, अशोक सावंत, अभय कदम, सरदार ताजर, नाना पारकर, मसुद मेमन, महेश अंधारी, विजय चव्हाण, हर्षल बांदेकर, दीपक भोगले, मंदार ओरसकर, नितीन तायशेटे, हरेश देऊलकर, ऋषिकेश नेवाळकर, संदीप शिरोडकर, उमेश शिरोडकर, दिनेश मुंबरकर, महेंद्र पारकर, गणेश प्रभूलकर, अमोल केळुसकर, मुकेश बावकर, सुनील परुळेकर, विजय केनवडेकर, अरविंद नेवाळकर, मनोज चव्हाण, हेमंत शिरपुटे, अरविंद सराफ, नाना साईल, बाळू तारी आदी उपस्थित होते. यावेळी ओरोसकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यापारी मेळावा जल्लोषात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
वाळके म्हणाले, ‘‘व्यापारी बांधवांना एकसंघ ठेवताना आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी कार्यरत राहावे.’’ तायशेट्ये यांनी व्यापारी बांधवांनी बदलत्या व्यापारावर दृष्टी ठेवून मार्गक्रमण करणे आवश्यक आहे. येणारी आव्हाने ही व्यापारी वर्गाला स्विकारणे महत्वाचे आहे, असे सांगितले. मालवण व्यापारी संघ एक कुटुंब आहे. यामध्ये काम करताना राजकारण विरहित काम झाले आहे. एकी हीच महत्त्वाची शक्ती आहे, असे विजय केनवडेकर यांनी सांगितले. अशोक सावंत यांनी व्यापारी संघाचे कार्य वाढविण्यासाठी ग्रामीण भागात सभासद नोंदणी करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व योगदान देण्याचे जाहीर केले. गणेश प्रभुलकर गेली सात वर्षे व्यापारी संघाचा खजिनदार म्हणून काम करताना सहकार्य मिळाल्याचे सांगून पारदर्शक कारभार करून नविन आणि जुन्या ज्येष्ठांना एकत्रित ठेवून काम करू, अशी ग्वाही दिली. युवा सदस्यांतर्फे महेंद्र पारकर, नूतन अध्यक्ष उमेश नेरुरकर यांनी मत मांडले. प्रमोद ओरसकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
---
बिनविरोध निवडून आलेले सदस्य
अध्यक्ष उमेश नेरुरकर, उपाध्यक्ष दीपक उर्फ नानाशेठ पारकर, अशोक सावंत, कार्यवाह-रवींद्र तळाशीलकर, सहकार्यवाह अभय कदम, कोषाध्यक्ष गणेश प्रभूलकर, सदस्य हर्षल बांदेकर, संदीप शिरोडकर, मंदार ओरसकर, अमोल केळूसकर, हरेश देऊलकर, शैलेश मालंडकर, सरदार ताजर, विजय चव्हाण, योगेश बिळवसकर, उमेश शिरोडकर, महेंद्र पारकर, स्वीकृत सदस्य श्रीकृष्ण तारी, अरविंद ओटवणेकर, दिनेश मुंबरकर, हेमंत शिरपुटे. कायम निमंत्रित प्रमोद ओरसकर, दशरथ कवटकर, नितीन तायशेटे, नितीन वाळके, विजय केनवडेकर, महेश अंधारी, गोविंद चव्हाण, सुहास ओरसकर, विठ्ठल साळगावकर, सुनील परुळेकर, पांडू करंजेकर, मुकेश बावकर, राजा शंकरदास, मसूद मेमन, अरुण साईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com