भोसले पॉलिटेक्निकमध्ये
जर्मन कंपनीतर्फे मुलाखती

भोसले पॉलिटेक्निकमध्ये जर्मन कंपनीतर्फे मुलाखती

भोसले पॉलिटेक्निकमध्ये
जर्मन कंपनीतर्फे मुलाखती

५५ विद्यार्थ्यांची प्रकल्पासाठी निवड

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ ः येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये ‘केएसपीजी’ या वाहन उद्योगासाठी सुटे भाग निर्मिती करणाऱ्या आघाडीच्या जर्मन कंपनीतर्फे कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आले.
कॉलेजच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागातर्फे आयोजित या पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये भोसले पॉलिटेक्निकसह शासकीय तंत्रनिकेतन मालवण व एमआयटीएम ओरोस येथील विद्यार्थीही सहभागी झाले. जिल्ह्यातील एकूण ९१ विद्यार्थ्यांनी या इंटरव्ह्यू प्रक्रियेत भाग घेतला. ऑनलाईन टेस्ट व मुलाखतीनंतर ५२ विद्यार्थ्यांची पुणे येथील प्रकल्पासाठी निवड करण्यात आली. मुलाखती घेण्यासाठी कंपनीचे एचआर मॅनेजर श्रीकांत बोंगाळे, प्रॉडक्शन मॅनेजर आनंद मिश्रा, फॅक्टरी मॅनेजर पी. व्ही. संतोष, असिस्टंट मॅनेजर चेतन नाईक-निंबाळकर उपस्थित होते. सर्व अधिकाऱ्यांनी कोकणातील विद्यार्थ्यांच्या टॅलेंटचे विशेष कौतुक करत अशा मुलाखती आयोजित करण्यासाठी भोसले पॉलिटेक्निक घेत असलेल्या पुढाकाराबद्दल संस्थेची प्रशंसा केली. ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडण्यासाठी कॉलेजचे टीपीओ विभाग प्रमुख मिलिंद देसाई, महेश पाटील, राहुल गिर्याळकर, हवाबी शेख, सचिन लांजेकर व श्रुती हेवाळेकर यांनी मेहनत घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com