रत्नागिरी ः पालिकेचा 147 वर्षांनी स्थापना दिवस

रत्नागिरी ः पालिकेचा 147 वर्षांनी स्थापना दिवस

rat२९१०.txt

बातमी क्र.. १० (पान २ साठी)

रत्नागिरी पालिकेचा शनिवारी
१४७ वर्षांनी स्थापना दिवस

आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा होणार गौरव; सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

रत्नागिरी, ता. २९ ः रत्नागिरी नगरपालिकेची स्थापना १ एप्रिल १८७६ रोजी झाली. तब्बल १४७ वर्षांनंतर १ एप्रिल २०२३ रोजी पालिकेचा स्थापना दिवस साजरा होणार आहे.
या निमित्ताने मागील पाच निवडणुका लढविलेल्या माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना गौरविण्यात येणार आहे. पदावरून उतरल्यानंतर जे माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक पालिकेत कार्यालयात येत नव्हते ते या दिवशी एकत्रितपणे दिसण्याचा योग येणार आहे. यावेळी पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरी पालिकेचे अनेक माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी पालिकेत येणे टाळले आहे. जी काही कामे असतील ती मोबाईलवरून संपर्क साधून मार्गी लावतात. मात्र, १ एप्रिलला पालिकेचा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने कार्यालयात येणाऱ्या आणि न येणाऱ्या माजी लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात येणार आहे. नगराध्यक्षांमध्ये विद्यमान आमदार राजन साळवी तसेच प्रमोद रेडीज, प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी, महेंद्र मयेकर, मिलिंद कीर, राहुल पंडित, मधू घोसाळे, राजेश्वरी शेट्ये या माजी नगराध्यक्षांना यानिमित्ताने पालिकेच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. ३० माजी नगरसेवकांनाही निमंत्रित केले जाणार आहे. यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन केले जाणार आहे. नगरविकास मंत्रालयाने एका परिपत्रकाद्वारे नगरपालिकांना स्थापना दिवस साजरा करण्याच्या सूचना केल्या आहेत.
................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com