भरधाव डंपर दगडी कुंपण तोडून दारात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भरधाव डंपर दगडी 
कुंपण तोडून दारात
भरधाव डंपर दगडी कुंपण तोडून दारात

भरधाव डंपर दगडी कुंपण तोडून दारात

sakal_logo
By

92344
कोळंब ः येथे दगडी कुंपण तोडून दारात घुसलेला डंपर.

भरधाव डंपर दगडी
कुंपण तोडून दारात

कोळंब येथील घटना

मालवण, ता. २९ : मालवण-कोळंब मार्गावर एक डंपर (एमएच ०७ सी ६१३१) हा थेट दगडी कुंपण तोडून थेट एका घराच्या दारात घुसला. मोठा आवाज होताच घरातील सदस्य व शेजारील ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले. अपघाताची तीव्रता बघून ग्रामस्थ हादरले. अपघातास कारणीभूत डंपर चालक दारूच्या नशेत असल्याचे बोलले जात होते. घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक बनले.
जे दगडी कुंपण तोडून डंपर घुसला त्या ठिकाणी मुले एकत्र बसतात. नेमकी आजच त्या ठिकाणी मुले नव्हती. तसेच दगडी कुंपण नसते तर डंपर थेट घरातच घुसला असता आणि मोठा अपघात झाला असता, अशी भीती व्यक्त करण्यात आली. दरम्यान, अपघाताची माहिती देऊनही पोलिस वेळेत न पोहोचल्याने ग्रामस्थ अधिक संतप्त बनले. अखेर पोलिस दाखल झाले. त्यावेळी ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त करत या मार्गावरून अशी धोकादायक डंपर वाहतूक बंद करा, अशी मागणी केली. नशेत असलेल्या डंपर चालकाची वैद्यकीय तपासणी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली.