चंद्रशेखर तायशेटेंचा मुंबईत सत्कार

चंद्रशेखर तायशेटेंचा मुंबईत सत्कार

92348
मुंबई ः नगररचनाकार चंद्रशेखर तायशेटे यांचा सपत्नीक सत्कार करताना उपसंचालक जयश्रीराणी सुर्वे.

चंद्रशेखर तायशेटेंचा मुंबईत सत्कार
ओरोस ः सिंधुदुर्गनगरी येथील सहाय्यक संचालक नगररचना कार्यालयातील नगररचनाकार चंद्रशेखर तायशेटे हे ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. त्यांनी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, औरंगाबाद येथील कार्यालयांतही सेवा बजावली. कर्मचाऱ्यांमध्ये प्रिय असणाऱ्या तायशेटे दाम्पत्याचा सत्कार मुंबई प्रदेश उपसंचालक नगररचना मूल्यांक विभाग जयश्रीराणी सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सहाय्यक संचालक विद्याधर देसाई, मोरे, मिलिंद आवडे, मकसुद सोलकर, बाळासाहेब काकड, प्रभुणे, सुमित मोरावरकर आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी, औरंगाबाद, मुंबई कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि नातेवाईक, मित्रमंडळी उपस्थित होते.
-----
मालवणात निबंध स्पर्धेचे आयोजन
मालवण : येथील बॅ. नाथ पै सेवांगण, बार्टी समतादूत, फुले, शाहू आंबेडकर विचारमंच मालवण यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेसाठी ‘डॉ. बाबासाहेब आबेडकरांनी महिलांना काय दिले?’ हा विषय आहे. यासाठी १००० शब्दमर्यादा असून विजेत्यांना अनुक्रमे १०००, ७००, ५०० व उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना प्रत्येकी ३०० रुपयांची पारितोषिके तसेच ग्रंथ भेट देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी निबंध स्वहस्ताक्षरात लिहून किंवा टाईप करून ६ एप्रिलपर्यंत बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण येथे आणून द्यावेत किंवा व्हॉटसअप क्रमांकावर पाठवावेत. विजेत्यांना ९ एप्रिलला सकाळी दहाला बॅ. नाथ पै सेवांगण येथे होणाऱ्या सलग वाचन उपक्रमाप्रसंगी पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com