कणकवलीत पुलाखाली पुन्हा अतिक्रमण

कणकवलीत पुलाखाली पुन्हा अतिक्रमण

kan301.jpg
92356
कणकवलीः शहरातील उड्डाण पुलाखाली आणि महामार्गावरील रस्त्यावर पुन्हा एकदा अतिक्रमण करून व्यवसाईकांनी बस्तान मांडले.
-----------
कणकवलीत पुलाखाली पुन्हा अतिक्रमण
हटाव मोहिमेनंतर थाटली दुकाने; रस्त्यावरील फिरत्या व्यावसायिकांचेही ठाण
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ३०ः महामार्ग प्राधिकरणने पोलीस बंदोबस्तात काही दिवसापुर्वी अतिक्रमण हटवले. शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या उड्डाण पुलाखाली भाजी, फळे, फुले, कपडे व अन्य स्टॉल धारकांनी केलेले अतिक्रमण हटविण्यात आले. ही मोहीम थांबली असे लक्षात आल्यावर पुन्हा एकदा रस्त्यावर आणि पुलाखाली फिरते व्यवसाईक ठाण मांडून बसले आहेत. याचा नागरिकांना, वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कणकवली शहरातील महामार्गावरील व्यावसायिकांचे अतिक्रमण हटाव मोहीम काही दिवसापुर्वी राबवण्यात आली. उड्डाणपुलाखाली वेगवेगळे पान स्टॉल, भाजीव्यवसायिकांची बांधकामे व अन्य बांधकामे आणि व्यापाऱ्यांनी मांडलेले बस्तान हटविण्यात आले. या अनधिकृत व्यावसायिकांना नोटीस देऊन पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली होती. पण, गेल्या दोन आठवड्यात हळूहळू अतिक्रमण करणारे व्यावसायिक रस्त्यावर येऊ लागले आहेत. नागरिकांना आपली वाहने थांबवण्यासाठी जागा ही मिळत नाही अशी स्थिती आहे. फळे, फुले, कापडे विक्रेत्यांनी पुन्हा एकदा अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. भाजी व्यवसायाबरोबरच कापड व्यवसाय, सुकी मासळी व्यावसायिक व अन्य व्यापाऱ्यांनी येथे पुन्हा एकदा अतिक्रमण केले आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. महामार्ग प्राधिकरणाने पुन्हा एकदा ही मोहीम राबवून कायमस्वरूपी हटाव मोहीम करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नगरपंचायतीचे सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक यांच्यात आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. मुख्याबाजारातील व्यापाऱ्यांचा रस्त्यावरील अनधिकृत व्यवसायिकांना विरोध आहे. लाखोरूपये खर्चकरून उभारलेले व्यवसाय़िक अशा अनधिकृत व्यापारापुळे मेटाकुटीस आले आहेत. हटाव मोहीमेचे त्या व्यापाऱ्यांनी स्वागत केले. पण, कारवाई थांबताच पुन्हा अनधिकृत व्यावसाईकांनी बस्तांन मांडले आहे. कणकवली शहरात वाहन थांब्याची सुविधा नाही. त्यामुळे पुलाखाली रस्त्यावर वाहने थांबवावी लागतात. पण, रस्त्यावरच भाजी, फळे, फुले व अन्य दुकाने लावली जात असल्याने वाहन चालकांची गैरसोय होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com