रत्नागिरी ः आरटीई’चे प्रतिपूर्ती शुल्क पूर्ववत

रत्नागिरी ः आरटीई’चे प्रतिपूर्ती शुल्क पूर्ववत

rat३०१७.TXT

बातमी क्र.. १७ (टुडे २ साठी)

‘आरटीई’चे प्रतिपूर्ती शुल्क पूर्ववत

संस्थाचालकांना दिलासा; प्रतिविद्यार्थी मिळणार १७ हजार ६७० अनुदान

रत्नागिरी, ता.३० ः शासनाने कोरोना काळात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) स्वयंअर्थसहाय्यित (खासगी) शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्ती रकमेत तब्बल ४५ टक्के कपात केली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, आरटीई शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आरटीई प्रवेशप्रक्रियेत असणाऱ्या शाळांना १७ हजार ६७० रुपये प्रतिविद्यार्थी शुल्क प्रतिपूर्ती दिले जाणार आहे.
दरवर्षी राज्यात बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण अर्थात आरटीईनुसार खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील २५ टक्के राखीव जागांवर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. या शाळांना संबंधित विद्यार्थ्यांचे शुल्क प्रतिपूर्तीच्या माध्यमातून शासनाकडून दिले जाते. कोरोना कालावधीत शाळा बंद असल्याने राज्य सरकारने आता प्रतिविद्यार्थ्यांमागे १७ हजार ६७० रुपयांऐवजी अवघे ८ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे खासगी शैक्षणिक संस्थाचालक मेटाकुटीस आले होते. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात शाळा नियमितपणे सुरू झाल्याने शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षण संस्थाचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करताना संबंधित संस्थांना काही बाबींची पडताळणी करावी लागणार आहे. त्यात प्रामुख्याने ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिलेल्या शाळांनी पहिली ते आठवीच्या शुल्काचा तपशील सरल किंवा ‘आरटीई’च्या वेबसाईटवर जाहीर करणे आहे.
-----
चौकट
नोंदणीकृत विद्यार्थी संख्याच अधिकृत
शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी आरटीईअंतर्गत प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचे आधारकार्ड सरल संकेतस्थळावर नोंदविणे संस्थेला बंधनकारक राहणार आहे. केवळ आधार नोंदणीकृत विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य धरली जाणार आहे. प्रत्यक्ष विद्यार्थीसंख्येपैकी केवळ २५ टक्के विद्यार्थी संख्या शुल्क प्रतिपूर्तीसाठी पात्र ठरणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्ट केले आहे.
...........................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com