साखरपा-इथे घडतात मूल्यशिक्षणाचे संस्कार

साखरपा-इथे घडतात मूल्यशिक्षणाचे संस्कार

rat3023.txt

बातमी क्र.. 23 (टुडे पान 2 साठी)

फोटो ओळी
-rat30p13.jpg ः

92402
साखरपा ः मूल्यशिक्षणाचे वर्ग घेताना अनुनाद फाऊंडेशनच्या संचालक पूजा खांडेकर.
-----------
इथे घडतात मूल्यशिक्षणाचे संस्कार

कबनूरकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संस्कारवर्गाची सांगता

साखरपा, ता. ३० ः विद्यार्थी घडवायचे तर केवळ पुस्तकी शिक्षण देणे अपेक्षित नाही. या संकल्पनेतून कबनूरकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मूल्यशिक्षणाचे संस्कारवर्ग वर्षभर पार पडले.
मुलांना समाजात वावरताना सामाजिक मूल्यांची ओळख करून देणे, त्यांचे शिक्षण देणे आणि त्यातून माणूस घडवणे अपेक्षित असते. हीच संकल्पना घेऊन कबनूरकर स्कूलमध्ये पाचवी ते आठवीच्या वर्गातील मुलांसाठी मूल्यशिक्षणाचे संस्कारवर्ग वर्षभर चालविण्यात आले. अनुनाद एज्युकेशनल अँड रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन या संस्थेकडून संस्थेच्या संचालक पूजा खांडेकर यांनी या वर्गांचे आयोजन केले होते. महिन्यातून दोन दिवस याप्रमाणे आठ महिन्यांत आठ विविध मूल्यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आला. या मूल्यशिक्षणामध्ये आदर, स्वच्छता, स्वयंशिस्त, प्रामाणिकपणा, वेळेचे नियोजन, पर्यावरण, स्वपरिचय, संवाद कौशल्य, कामाची समानता या मूल्यांवर भर देण्यात आला. दर महिन्याला एक याप्रमाणे मूल्यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आला.
मूल्यशिक्षण हे केवळ एकदा सांगून होणारे संस्कार नसल्याचे खांडेकर यांनी सांगितले. त्यामुळे यंदा झालेल्या मूल्यांच्या ओळखीचे पुढील वर्षी प्रत्यक्ष कृतीतून आकलन आणि आचरण होणार असल्याचे त्या म्हणाल्या. मुख्याध्यापिका लीना कबनूरकर यांनीही अशा वर्गांची गरज व्यक्त करत त्यातून परीक्षार्थींमधून विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांमधून माणूस घडविण्याची ही प्रक्रिया असल्याचे मत व्यक्त केले.
......................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com