संगमेश्वऱ ः पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

संगमेश्वऱ ः पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

(टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
-rat३०p५.jpg-

....................

92393
संगमेश्वर ः आशुतोष बापट यांनी लिहिलेल्या ‘सफर चिपळूण, गुहागर परिसराची’ पुस्तकाचे मुखपुष्ठ
-----------
‘सफर चिपळूण, गुहागर परिसराची’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

संगमेश्वर, ता. ३० ः मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्राचे ख्यातनाम अभ्यासक आशुतोष बापट यांनी लिहिलेल्या ‘सफर चिपळूण, गुहागर परिसराची’ या पुस्तकाचे प्रकाशन २ एप्रिलला चिपळूण शहरातील ब्राह्मण सहायक संघाच्या सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. पुस्तकाला येथील ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहासाचे व्यासंगी अभ्यासक प्रकाश देशपांडे यांची प्रस्तावना आहे. कार्यक्रमाला ज्येष्ठ मूर्तितज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे, आमदार शेखर निकम उपस्थित राहणार आहेत. यावेळी ज्येष्ठ दुर्गतज्ज्ञ प्र. के. घाणेकर यांचा पंच्याहत्तरीनिमित्त विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
बापट यांची ‘सफर संगमेश्वर, देवरूखची’, ‘शिल्पसमृद्ध कोकण’, ‘सफर देखण्या महाराष्ट्राची’, ‘कोणार्कचे सूर्यमंदिर’, ‘सफर ओडिशाची’, ‘सफर हंपी-बदामीची’, ‘भटकंती आडवाटेवरची’, ‘शिल्पसमृद्ध शिवमंदिरे’, ‘नदीच्या खोऱ्यात’, ‘कंबोडिया’, ‘दुर्गांपलीकडला सह्याद्री’, ‘पल्लव आणि चोळांच्या देशात’, ‘भारतीय कलेतील मिथकशिल्पे’ आदी १५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्यवाह विनायक ओक, कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी केले आहे.
..........................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com