सावर्डे-कापशी नदीमध्ये मगरीचा संचार

सावर्डे-कापशी नदीमध्ये मगरीचा संचार

फोटो ओळी
-rat३०p३.jpg ः KOP२३L९२३९१ सावर्डे ः मुंबई-गोवा महामार्गावरील पेट्रोलपंपात निसर्गमित्र व प्राणीमित्र राजेश सावंत यांनी मगरीला पकडले.
--------------

कापशी नदीमध्ये मगरीचा संचार

सावर्डेतील पेट्रोलपंपात आढळलेली मगर नैसर्गिक अधिवासात
सावर्डे, ता. ३० ः चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील कापशी नदीला लागून असणाऱ्या येथील खोतवाडी ते वावेमार्गे कापशी नदीला जोडणाऱ्या छोट्या नदीपत्रात मगरीचा संचार आढळून येत आहे. नदीपात्रापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर असणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावरील सचिन पाकळे यांच्या पेट्रोलपंपात गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास मगर संचार करताना पंप कर्मचारी प्रशांत चव्हाण आढळून आली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशांत चव्हाण यांनी येथील प्राणीमित्र राजेश सावंत यांना संपर्क साधला. सावंत यांनी मगरीला पकडून सावर्डे येथील वनपाल उमेश आखाडे यांना माहिती दिली. वनपाल आखाडे, नांदगावचे वनरक्षक अनंत मेस्त्री घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या मगरीला ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात तिची मुक्तता केली. दरम्यान, कापशी नदीमध्ये मगरीचा संचार पाहायला मिळत असल्याने ग्रामस्थांनी सावधानता बाळगावी, असे आहवान वनविभागाकडून करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com