
चिपळूण-संक्षिप्त
rat३०१०.TXT
पान २ साठी, संक्षिप्त
खेर्डीत उद्या ‘अर्थसंकल्पात
ओबीसींची भागिदारी’वर चर्चासत्र
चिपळूण, ता. ३० ः ओबीसी आरक्षण समर्थक समविचारी संघटना, बामसेफ, युनिटी ऑफ मूलनिवासी संघ आणि सहयोगी संघटना, ओबीसी संघर्ष समन्वय समितीतर्फे १ एप्रिलला सकाळी १०.३० वाजता (कै.) खेर्डी येथील माधवराव बाईत छत्रालयात ‘भारतीय अर्थसंकल्पात ओबीसींची भागिदारी?’ या विषयावर मार्गदर्शन व चर्चासत्रचे आयोजन केले आहे. ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे नंदकुमार मोहिते, बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलाकांत काळे मार्गदर्शन करणार आहेत. ओबीसी बांधवांसाठी शेती, रोजगार, शिक्षण, आरक्षण आणि व्यवसायासाठी किती निधी उपलब्ध करून दिला आहे, केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकास यांचा त्याचा किती लाभ होणार आहे, देशभरात संपूर्ण ओबीसींची संख्या सर्वाधिक असूनही अर्थसंकल्पामध्ये उपलब्ध केलेला निधी योग्य आहे का? याविषयी चर्चा करण्यात येणार आहे.
.......................
कर्णबधिर दिव्यांगांची लायसन्स
चाचणी सांकेतिक भाषेत हवी
रत्नागिरी ः आस्था सोशल फाउंडेशनतर्फे कर्णबधिर दिव्यांगांच्या ड्रायव्हिंग लायसन्सबाबत दिलेल्या निवेदनानंतर उपप्रादेशिक परिवहन रत्नागिरी विभागाकडून लायसन देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु श्रवणदोष व वाचादोष असलेल्या दिव्यांगांमध्ये भाषेच्या अर्थाचे आकलन होण्यात अडचणी येतात. आरटीओ कार्यालयाकडून लर्निंग ड्रायव्हिंग लायसन देण्यापूर्वी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येते, ज्यामध्ये प्रश्न व उत्तरे ठराविक सेकंद स्क्रीनवर दिसतात. तो प्रश्न वाचून समजण्यात दिव्यांगांना अडचणी येतात व त्यामुळे चार पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून उत्तर देईपर्यंत टाईम आऊट होतो. परंतु तोच प्रश्न जर त्यांना साईन लँग्वेजमध्ये विचारला तर ते त्वरित उत्तरे देऊ शकतील. ही प्रॅक्टिकल अडचण लक्षात घेऊन कायमच दिव्यांगांच्या वतीने वकालत करणाऱ्या आस्था दिव्यांग वकालत केंद्रामार्फत ही परीक्षा लेखी अथवा साईन लँग्वेजमध्ये घेण्यात यावी, असे निवेदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आले. कोणत्याही प्रकारच्या परीक्षा दिव्यांगांसाठी सुलभ, सुगम्य असणे आवश्यक असल्याचे निवेदन आस्थाच्या वतीने श्रीमती सुरेखा पाथरे यांनी दिले.
................