आंबा विक्रीसाठी महामार्गालगत हवेत स्टॉल

आंबा विक्रीसाठी महामार्गालगत हवेत स्टॉल

rat३०११.txt

-rat३०p८.jpg ः
९२३९६
खेड ः मुंबई-गोवा महामार्गालगत आंबा विक्रीसाठी बसलेले खेड येथील आंबाविक्रेते बाळकृष्ण उर्फ मामा जाधव.
(सिद्धेश परशेट्ये ः सकाळ छायाचित्रसेवा)
-
आंबा विक्रीसाठी महामार्गालगत स्टॉलची गरज

बाळकृष्ण जाधव ; महोत्सवापेक्षा थेट विक्रीवरच भर

खेड, ता. ३० ः कोकणातील विविध उत्पादनांची ओळख व्हावी याकरिता अनेक ठिकाणी छोटे-छोटे महोत्सव भरवून या ठिकाणी आंब्याची विक्री केली जाते; परंतु आज तळागाळातील आंबा बागायतदार अद्यापही आपल्या बागेतील आंबा विकण्यासाठी रस्त्याच्या लगतच ताटकळत बसलेला दिसून येत आहेत. प्रशासनाकडून यावर ठोस उपाययोजना करण्यात येऊन खेड शहर परिसर तसेच महामार्गालगत आंबा विक्रीसाठी आम्हाला स्टॉल मिळावेत, अशी मागणी खेड येथील आंबा उत्पादक बाळकृष्ण उर्फ मामा जाधव यांनी केली आहे.
दरवर्षीच या फळांच्या राजाला हवामानाच्या बदलामुळे फटका बसतो. यावर्षी सुरवातीला आंब्याला पोषक असे हवामान असल्यामुळे आंबा चांगला आला आहे; परंतु सद्यःस्थितीत पहाटेची थंडी दुपारच्या दरम्यान भयंकर उष्ण अशी परिस्थिती असल्यामुळे यापुढे आंबापिक बागायतदारांच्या किती हाती लागेल, ही शंकाच आहे; परंतु या व्यवसायात मोठ्या प्रमाणात दलालांचा सुळसुळाट झाला असून, बागायतदारांकडून कमी किंमतीत आंबा घेऊन मुंबई-पुण्याच्या मार्केटमध्ये हा आंबा दलालाकडून चढ्या दराने विकला जात आहे. त्यामुळे आपल्या आंब्याला चांगला भाव मिळावा यासाठी मुंबई-गोवा महामार्गालगत आंबा बागायतदार आंबा विक्रीसाठी घेऊन बसलेले दिसून येतात. या मोसमात मोठ्या प्रमाणात मुंबई-पुण्याचे पर्यटक कोकणात दाखल होतात. त्यामुळे महामार्गावर तसेच शहर परिसरात मोठ्या प्रमाणात आंब्याची विक्री होताना दिसून येते; परंतु या विक्रेत्यांना त्यांचा हमीभाव मिळवण्यासाठी रणरणत्या उन्हातच आपला हा व्यवसाय थाटावा लागत आहे.
आंबा महोत्सवातून आंबा विक्रीसाठी जाताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. या ठिकाणी आंबा नेण्यासाठी वाहतूक, कर्मचारी, आंबा नेताना उत्तम प्रतिचे पॅकिंग यासारख्या गोष्टी कराव्या लागतात तसेच वर्षाची गडीमजुरी, खतपाणी या गोष्टींचा खर्च विक्रीतून निघताना आम्ही मेटाकुटीस येत आहोत. त्यामुळे महोत्सवामध्ये जाण्यापेक्षा आमचा आंबा या ठिकाणी विक्री करणे योग्य वाटते, अशी माहिती आंबा विक्रेते बाळकृष्ण उर्फ मामा जाधव यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com