अभ्यासासह हवा वैज्ञानिक दृष्टिकोन

अभ्यासासह हवा वैज्ञानिक दृष्टिकोन

swt3022.jpg
92481
तळेरेः वामनराव महाडीक विद्यालयात आयोजित विज्ञानजत्रा कार्यक्रमातील विजेत्यांना गौरविताना डॉ. योगेश महाडीक व मान्यवर. (छायाचित्र ः एन. पावसकर)

अभ्यासासह हवा वैज्ञानिक दृष्टिकोन
डॉ. योगेश महाडीकः तळेरे विद्यालयात ''विज्ञान जत्रा'' उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ३० : उच्च ध्येय गाठायचे असल्यास अभ्यासाबरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायला हवा. तरच आयुष्यात उंच भरारी घेता येईल, असे प्रतिपादन शासकीय तंत्रनिकेतन मालवणचे अधिव्याख्याता डॉ. योगेश महाडिक यांनी केले. येथील वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच अध्ययन संस्था, मुंबई (कोळोशी) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेच्या डॉ. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवनात आयोजित ''विज्ञान जत्रा'' कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रशालेच्या पाचवी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या विज्ञान जत्रेमध्ये सहभाग घेतला. यात सुमारे २५ प्रयोगांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन मांडण्यात आले. यावेळी वामनराव महाडीक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य अविनाश मांजरेकर, अध्ययन संस्था, मुंबई शाखा कोळोशीच्या रसिका कुबडे, दामिनी मराठे, शाळा समिती सदस्य प्रवीण वरुणकर, संतोष जठार, संतोष तळेकर, नीलेश सोरप, श्रावणी कॉम्प्युटरचे संचालक सतीश मदभावे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. महाडीक यांनी, एखादी प्रयोगाची प्रतिकृती करताना त्यातील नावीन्यता काय, समाजाला त्याची उपयोगिता आहे, याचा विचार करणे गरजेचे असते. तरच त्या प्रयोगाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. लहान वयापासूनच अभ्यासामध्ये अशी वैज्ञानिक बुद्धी वापरली, तर तुम्ही जीवनात उंच भरारी घेऊ शकता, असे मार्गदर्शन केले. महिनाभरापासून विद्यार्थ्यांना प्रयोग देऊन ते प्रत्यक्षात यशस्वी होण्यापर्यंत प्रशालेच्या सहायक शिक्षिका सुचिता सुर्वे यांनी मेहनत घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. अध्ययन संस्थेच्या कुबडे यांनी विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्वक प्रतिकृतींची निर्मिती आकर्षकरित्या केले, असे गौरवोद्गार काढले. अध्ययन संस्था विद्यार्थ्यांना घडवितानाच त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन सक्षम बनविण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी विद्यालयाच्यावतीने डॉ. महाडीक यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. एन. पी. गावठे यांनी, आभार सुचिता सुर्वे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com