हर्णैमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

हर्णैमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

rat3035.txt

बातमी क्र..35 (पान 2 )

फोटो ओळी
-rat30p23.jpg ः

92478
हर्णै ः व्हॉलिबॉलमध्ये पहिल्याच वर्षी जिल्हास्तरावर पारितोषिक मिळवल्याबद्दल गोळे हायस्कूलच्या विद्यार्थिनींना पारितोषिक आणि भेटवस्तू देताना एकता मंचाचे अध्यक्ष भालचंद्र मुसलोणकर, गोळे हायस्कूलचे मुख्याध्यापक तानाजी लेंडवे आणि दीपक खेडेकर.

.....

हर्णैमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल यश

हर्णै, ता. 30३० ः हर्णै विद्यामंदिर हर्णै, हर्णै पंचक्रोशी कमिटी व हर्णै पाळंदे एकता विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक आणि क्रीडाक्षेत्रात उज्जवल यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
एन. डी. गोळे हायस्कूलची माजी विद्यार्थिनी डॉ. पूजा बारटक्के, डॉ. मनाली बारटक्के, डॉ. अंकिता वाघमारे या विद्यार्थिनींनी मेडिकल विभागातील बीएचएमएस डॉक्टर म्हणून पदवी प्राप्त केली. त्याचप्रमाणे श्रद्धा पवार या माजी विद्यार्थिनीने बी.स्सी. (हॉर्टिकल्चर) विभागात सुवर्णपदक मिळवले. हर्णैमधील एन. डी. गोळे हायस्कूलमध्येच या विद्यार्थिनींनी शिक्षण घेतले आहे. गोळे हायस्कूलमध्येच शिक्षण घेत असलेल्या व्हॉलिबॉल संघाच्या मुलींनी क्रीडाक्षेत्रात मोठी कामगिरी केली. व्हॉलिबॉलमध्ये पहिल्याच वर्षी तालुकास्तरीय शालेय स्पर्धेत प्रथम कमांक व जिल्हास्तरीय स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. खेमराज कबड्डी संघानेही तालुकास्तरावर एकदा प्रथम कमांक, दुसऱ्या वेळेस द्वितीय क्रमांक, पाच वेळा तृतीय क्रमांक आणि चारवेळा चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. या सर्वांचा गौरव करण्यात आला.
चैताली मेहंदळे हर्णै गावची रहिवासी असून, ती डोंबिवलीमधील कलारंग ढोलवादन पथकाची सदस्य आहे. जी-२० परिषद छत्रपती संभाजीनगर येथे झाली. या पथकाला तिथे ढोल वाजवण्यासाठी निमंत्रित केले होते. तिथे जी-२० परिषदेचे ३२ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्यासमोर चैतालीने या पथकामधून उत्कृष्ट ढोलवादन केले. गावातील हे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी एन. डी. गोळे हायस्कूल हर्णैच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना भेटवस्तू व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.
यावेळी अंकुश बंगाल, सरपंच ऐश्वर्या धाडवे, भालचंद्र मुसलोणकर, व्याख्याते नितीन सावंत, मिलिंद जोशी, राकेश तवसाळकर, डॉ. कृष्ण-कुमार कवडे, हर्णै पोलिस दूरक्षेत्राचे कर्मचारी दिलीप नवाले, सुरेश मोरे, सुधीर राणे, अर्पिता पतंगे, हर्णै-पाळंदे एकता विचारमंच, हर्णै विद्यामंदिर, हर्णै संस्था व हर्णै पंचक्रोशी कमिटीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
--------------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com