शालेय क्रीडा स्पर्धेत आर्या पाटीलचे यश

शालेय क्रीडा स्पर्धेत आर्या पाटीलचे यश

swt३०२७.jpg
९२४९९
आर्या पाटील

शालेय क्रीडा स्पर्धेत
आर्या पाटीलचे यश
वेंगुर्ले, ता. ३०ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धेत वेंगुर्ले हायस्कूलमधील आठवीतील विद्यार्थिनी आर्या पाटील हिने विविध मैदानी स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केले. आर्या हिने २०० मीटर धावणे प्रकारात प्रथम, ८० मीटर हर्डल्समध्ये तृतीय, तर १०० मीटर धावणेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. तिच्या या यशाबद्दल वेंगुर्ले हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी तिचे अभिनंदन केले.
.................
swt३०२६.jpg
९२४९८
वेंगुर्लेः विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार यांना श्रीनिवास गावडे यांनी लोकराज्य मंचची माहिती दिली.

विशेष पोलिस महानिरीक्षक
पवारांचे वेंगुर्लेत स्वागत
वेंगुर्ले, ता. ३०ः लोकराज्य मंचाचे मुख्यप्रमुख डॉ. श्रीनिवास गावडे यांच्या हस्ते कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार यांचे तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांचे वृक्ष देऊन वेंगुर्लेनगरीत स्वागत केले. डॉ. गावडे यांनी मंचच्या कार्याची माहिती दिली. पोलिस व सामान्य माणूस यात समन्वयक म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंच प्रमुख जयराम वायंगणकर, मंच उपप्रमुख राजेश परब उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com