चिपळूण ःतृणधान्य पीक पाककला स्पर्धेत श्रुती शिंदे प्रथम

चिपळूण ःतृणधान्य पीक पाककला स्पर्धेत श्रुती शिंदे प्रथम

फोटो ओळी
-ratchl304.jpg ः KOP23L92475
चिपळूण ः विजेत्या महिलांचा सन्मान करताना माजी सभापती पूजा निकम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुराडे, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र माने.

तृणधान्य पीक पाककला स्पर्धेत श्रुती शिंदे प्रथम
जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनात इडली, नानकटाई, लाडू , अप्पेवर पसंतीची मोहर
चिपळूण, ता.३०ः येथील कृषी विभागाच्या वतीने शहरातील (कै.) अण्णासाहेब खेडेकर क्रीडासंकुलात जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या जिल्हास्तर तृणधान्य पीक पाककला स्पर्धेत मोरवणे येथील श्रुती शिंदे यांनी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. रत्नागिरीतील सुलभा फणसळकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत जिल्ह्याभरातील एकूण 33 महिला स्पर्धक सहभागी झाले होते.
राष्ट्रीय कृषी विकास योजना भात लागवड व गुणवत्ता सुधार प्रकल्पांतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी चिपळूण यांच्यावतीने जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन सुरू आहे. गुरूवारी दुसऱ्या दिवशीही या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या निमित्ताने आयोजित तृणधान्य पिकांच्या पाककला स्पर्धेत जिल्हाभरातील महिलांनी नाचणी, वरी, ज्वारी, हरिक, बाजरीपासून विविध चविष्ट पदार्थ बनवले होते. याचे परीक्षण सृष्टीज्ञान संस्थेच्या साचालिका संगीता खरात, खरवते येथील शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी सहाय्यक प्रा. ओंकार निर्मळ, रिगल कॉलेज प्रा. मिकेश पवार यांनी केले.
स्पर्धेत तृणधान्यापासून शिंदे यांनी बनवलेल्या इडली, नानकटाई, लाडू आणि अप्पे या पदार्थांना प्रथम तर फणसळकर यांनी बनवलेल्या वरो घारगे याला द्वितीय क्रमांक मिळाला तसेच किशोरी कामिरकर यांनी बनवलेल्या ज्वारी केक आणि सोलकडीला तृतीय क्रमांक मिळाला आहे. याबरोबर रत्नागिरी-पावस येथील प्रज्ञा फडके, खेर्डीतील श्रद्धा कदम, सती येथील गौरी देसाई यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या सर्वांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com