किल्ले सिंधुदुर्गवर रामजन्मोत्सव उत्साहात

किल्ले सिंधुदुर्गवर रामजन्मोत्सव उत्साहात

swt3020.jpg
92479
तारकर्लीः येथील महापुरुष मंदिरात रामजन्मोत्सव सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. (छायाचित्रः बाबू टिकम)
swt3021.jpg
92480
मालवणः किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात रामजन्मोत्सव सोहळा झाला. (छायाचित्रः हितेश वायंगणकर)

किल्ले सिंधुदुर्गवर रामजन्मोत्सव साजरा
हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोहळा; तालुक्यात भक्तिमय वातावरण
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३० : रामनामाच्या जयघोषात आज किल्ले सिंधुदुर्गसह, तारकर्ली, आचरा, शहरातील विविध मंदिरांमध्ये रामजन्मोत्सव सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. कीर्तन, रामजन्मावर आधारित गीतांनी परिसर भक्तिमय बनल्याचे चित्र होते.
येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवरील शिवराजेश्वर मंदिरात रामजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त हजारो भाविक दाखल झाले. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली होती. कीर्तनकार मंगेश परब यांचे कीर्तन पार पडल्यानंतर रामजन्म सोहळा पार पडला. यावेळी रामनामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर पालखी सोहळा झाला. या सोहळ्यात पुजारी सयाजी सकपाळ यांच्यासह किल्ल्यातील रहिवाशी तसेच शहरातील, तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. रात्री स्थानिक कलाकारांचा ‘गोष्ट तुझी माझी’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. तारकर्ली येथील महापुरुष मंदिरातही रामनवमी उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. तालुक्यातील भाविक, मच्छिमार बांधव या सोहळ्यात सहभागी झाले. भाविकांकडून रामनामाचा जयघोष करण्यात आला. रामजन्मोत्सवानिमित्त कीर्तनकार श्री. बटा यांचे कीर्तन झाले. दुपारी १२.३० वाजता रामजन्म सोहळा झाला. यावेळी पुष्पवृष्टी करण्यात आली. पालखी सोहळ्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. शहरातील भरड दत्तमंदिर, गवंडीवाडा येथील राममंदिर, मेढा येथील राममंदिर तसेच परिसरातील अन्य मंदिरांमध्येही रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com