एसटीच्या भंगार गोदामाला आग

एसटीच्या भंगार गोदामाला आग

एसटीच्या भंगार गोदामाला आग
कणकवलीः शहरातील एसटी विभागीय कार्यशाळेच्या आवारातील भंगाराचे साहित्य असलेल्या गोदामाला आग लागली. या आगीत एसटीचे भंगाराचे १५०० रूपयांचे साहित्य जळाले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली. या बाबत एसटीचे कर्मचारी संदिप विष्णू पाटील ( वय ३९ रा. कणकवली) यांनी पोलिसात दिली आहे. विभागीय कार्यशाळेच्या लगत वीज वितरण कंपणीचे कार्यालय आहे. त्या परिसरात लागलेल्या वनव्यामुळे एसटीच्या कार्यशाळेतील आवारातील सुक्या चाऱ्याने आगीचा भडका उडाला. कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com