स्पर्धा परीक्षांमधून व्यक्तिमत्व विकास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्पर्धा परीक्षांमधून व्यक्तिमत्व विकास
स्पर्धा परीक्षांमधून व्यक्तिमत्व विकास

स्पर्धा परीक्षांमधून व्यक्तिमत्व विकास

sakal_logo
By

swt३०३६.jpg
९२५२७
उसपः शांतादुर्गा विद्यामंदिर शाळा नं. १ येथे आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांसह मान्यवर.

स्पर्धा परीक्षांमधून व्यक्तिमत्व विकास
प्रकाश गवसः उसपमध्ये वक्तृत्व स्पर्धेस प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ३१ः वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो. त्याचबरोबर विचार स्वातंत्र्यही प्राप्त होते. सिंधू साहित्य संघ, दोडामार्ग यांनी विद्यार्थ्यांना हे व्यासपीठ मिळून दिले आहे. असा संघ तालुक्यात असावा, हे स्वप्न आज पूर्ण झाल्यासारखे वाटले, असे उद्गार माजी सरपंच तथा माजी जिल्हा सिंधुदुर्ग बँक संचालक प्रकाश गवस यांनी वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी काढले.
सिंधू साहित्य संघ, दोडामार्ग व शांतादुर्गा विद्यामंदिर उसप नं. १ यांच्यावतीने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा झाली. यावेळी उसप ग्रामपंचायत माजी सरपंच तथा जिल्हा सिंधुदुर्ग बँक माजी संचालक गवस, सरपंच रुचिता गवस, उपसरपंच बळीराम नाईक, सिंधू साहित्य संघ अध्यक्ष रघुनाथ सोनवलकर, चांदू मळीक, सुमित दळवी, सुमन कासार, मुख्याध्यापक दिलीप कळणेकर आदी उपस्थित होते.
श्री. गवस म्हणाले, ‘‘आजचे युग हे विज्ञान व स्पर्धेचे आहे. त्यामुळे मुलांनी विद्यार्थी दशेत असताना जास्तीत जास्त वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला पाहिजे. आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी आधुनिकतेची कास धरतानाच वडिलोपार्जित संस्काराची शिदोरी घेऊन चालायला हवे. अशा वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतोच, शिवाय विचार स्वातंत्र्यही प्राप्त होते. सिंधू साहित्य संघ, दोडामार्ग यांनी विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळून दिले असून हा एक निश्चितच आदर्शवत उपक्रम आहे.’’ प्रास्ताविक रघुनाथ सोनवलकर यांनी केले.
स्पर्धा लहान व मोठ अशा दोन गटात पार पडली. लहान गटात तालुक्यातील १८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यात अनुक्रमे चिन्मयी खानोलकर (जिल्हा परिषद शाळा दोडामार्ग नं. १), शुभंकर नाईक (शांतादुर्गा विद्यामंदिर उसप नं. १), सुचित्रा गोंधळी (कुडासे हायस्कूल) यांनी प्रथम तीन, तर उत्तेजनार्थ वैभवी धुरी (शांतादुर्गा विद्यामंदिर उसप) हिला गौरविले. परीक्षण प्रेमनाथ गवस, सुमन कासार यांनी केले. मोठ्या गटात १४ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात आदेश खानोलकर (कळणे हायस्कूल), समीक्षा गवस (सोनावल हायस्कूल), प्राजक्ता जाधव (उसप हायस्कूल), उत्तेजनार्थ अर्बिता कुबल (भेडशी हायस्कूल). परीक्षण पत्रकार संदेश देसाई, शिक्षिका सौ. शेटकर यांनी केले. सूत्रसंचालन सुमित दळवी यांनी केले.