गावडे काका महाराजांच्या संकल्पनेतून गोव्यात लवकरच स्वामी समर्थ मंदिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावडे काका महाराजांच्या संकल्पनेतून गोव्यात लवकरच स्वामी समर्थ मंदिर
गावडे काका महाराजांच्या संकल्पनेतून गोव्यात लवकरच स्वामी समर्थ मंदिर

गावडे काका महाराजांच्या संकल्पनेतून गोव्यात लवकरच स्वामी समर्थ मंदिर

sakal_logo
By

swt३०१.jpg
९२४०६
श्री गावडेकाका महाराज

गावडेकाका महाराजांच्या संकल्पनेतून
गोव्यात लवकरच स्वामी समर्थ मंदिर
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३०ः येथील श्री श्री १०८ महंत सदगुरू श्री गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतून श्री स्वामी समर्थ श्रध्दा भक्त सेवा न्यासाच्या माध्यमातून गोव्यात लवकरच श्री स्वामी समर्थ मंदिर प्रस्थापित होत आहे.
सदगुरू श्री गावडे काका महाराजांचा उद्या (ता. ३१) वाढदिवस साजरा होत आहे. गोव्याच्या देवभूमीत बेती येथे ऐतिहासिक अशा १०८ यज्ञकुंडांच्या शिवमहायागाचे आयोजन करून श्री श्री १०८ महंत सदगुरू श्री गावडे काका महाराजांनी इतिहास घडविला. काकांच्या कार्यक्षेत्रावर प्रकाशझोत टाकायचा झाला तर कदाचित शब्दही अपुरे पडतील. त्यांच्या कार्यक्षेत्राची सुरुवात ही आध्यात्मिक क्षेत्रातून झालेली असली तरी त्यांनी त्याला अनेक पैलू पाडले आहेत. त्यामुळे अनेक बुध्दिजीवी, कष्टाळू, ज्ञानी काकांच्या साधकांमध्ये आहेत. काका आपल्या कृतीतून समोरच्याला घडवत असतात. काकांनी तरुण-तरुणींना व्यवसायात प्रावीण्य मिळवून दिले आहे. आजच्या तरुण पिढीलाही कमी कष्टात जास्त पैसा हवा असतो; परंतु कष्टाला पर्याय नाही, याचे जिवंत उदाहरण म्हणजे स्वत:च्या मुलाला, सुजयला एक यशस्वी उद्योजक बनवून तरुणाईपुढे उदाहरण ठेवले आहे.
काकांनी निसर्गोपचार तज्ज्ञ, रेखी मास्टर ही पदवी घेऊन अनेकांना सेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच श्री सद्‍गुरु भक्त सेवान्यासच्या माध्यमातून कॅन्सरग्रस्त रुग्णांस मदत, निराधारांना आधार योजना, आपत्कालीन लोकांना तातडीची मदत, विद्यार्थी दत्तक योजना, योग व मेडिटेशन केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. अनेकांना प्रशिक्षण, अनेक ठिकाणी योगावर्ग, व्यसनमुक्ती मार्गदर्शन, निसर्गोपचार केंद्राच्या माध्यमातून रुग्णांची सेवा, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ''मन ही एक अद्भूत शक्ती'' या कार्यक्रमातून मार्गदर्शन अशी अनेक उद्दिष्टे समोर ठेवून ही संस्था महाराष्ट्रात अग्रेसर आहे.