रत्नागिरी-रत्नागिरीतील घरफोडी उघड, 8 लाखाचा ऐवज हस्तगत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-रत्नागिरीतील घरफोडी उघड, 8 लाखाचा ऐवज हस्तगत
रत्नागिरी-रत्नागिरीतील घरफोडी उघड, 8 लाखाचा ऐवज हस्तगत

रत्नागिरी-रत्नागिरीतील घरफोडी उघड, 8 लाखाचा ऐवज हस्तगत

sakal_logo
By

रत्नागिरीतील घरफोडीचा छडा;
८ लाखांचा ऐवज हस्तगत

दोघांच्या मुसक्या आवळल्या; तिसऱ्याचा शोध सुरू

रत्नागिरी, ता. ३० : शहर पोलिसांनी मोठी घरफोडी उघडकीस आणली आहे. शहरातील मांडवीरोड येथील घरकुल अपार्टमेंटमधील सदनिका फोडून चोरी करणाऱ्या दोघा संशयितांकडून २६ तोळे सोने व ३० हजारांची रोकड असा ८ लाख ३० हजारांचा ऐवज हस्तगत केला. २७ जानेवारी रोजी ही चोरी झाली होती. शहर पोलिस निरीक्षक विनित चौधरी यांनी हुशारीने या प्रकरणाचा छडा लावला.
मांडवी येथील घरकुल अपार्टमेंटमधील सदनिका फोडून चोरी झाल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली. चोरट्यांनी दरवाजाचा अज्ञात इसमाद्वारे कडी-कोयंडा तोडून २६ तोळे सोने व ३० हजार रोकड लांबविली होती. या घरफोडीच्या अनुषंगाने शहर पोलिस ठाणे येथे अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने (डीबी स्कॉड) तपास सुरूच ठेवला होता. गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करण्यात आला.
या गुन्ह्यामध्ये एका संशयित महिलेसह एका इसमास बुधवारी (ता. २९) अटक केले. दोन्ही संशयितांकडे गुन्ह्यातील चोरी केलेल्या दागिन्यांबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यांनी गुन्ह्यातील चोरी केलेले दागिने शेजारील जिल्ह्यातील साथीदाराच्या मदतीने एका सोनाराकडे विक्री केल्याचे सांगितले. २७ मार्चला पथकाने शेजारील जिल्ह्यात जाऊन गुन्ह्यातील तिसऱ्या संशयिताचा शोध घेतला, परंतु तो सापडलेला नाही. संशयितांना गुन्ह्यातील चोरीस गेलेले दागिने विक्री केलेल्या सोनाराचे दुकान मिळाले. त्या सोनाराच्या दुकानातून चोरीस मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
या गुन्ह्यातील एकूण चोरीस गेलेले विविध सोन्याचे दागिने व ३० हजार रुपये असा एकूण ८ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. दोन्ही संशयितांना न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तसेच या महिलेच्या (शेजारील जिल्ह्यामधील) अन्य एका साथीदाराचा शोध सुरू आहे. तसेच गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, शहर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश साळुंखे, प्रसाद घोसाळे, प्रवीण बर्गे, अमोल भोसले, संकेत महाडिक, मनोज लिंगायत, आशिष भालेकर, पंकज पडेलकर, विनय मनवल या पथकाने ही कारवाई केली.